आशियाई पदक विजेती अॅथलीट मंजूवर 5 वर्षांची बंदी
06:26 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ चेन्नई
Advertisement
2014 आशियाई क्रीडा स्पर्धेतील हातोडाफेकपटू कांस्यपदक विजेती मंजू बाला हिच्यावर राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीने डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच वर्षांची बंदी घातली आहे. 36 वर्षीय बालाचा निलंबनाचा कालावधी 10 जुलै 2024 पासून लागू झाला आहे.
मागिल वर्षी राज्यस्थानमधील तिच्या गावी झालेल्या स्पर्धेतून मंजू बालाची चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. तिने 2014 च्या इंचेऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या हॅमर थ्रोमध्ये 60.47 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले होते. 2021 मध्ये राजस्थान राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने 64.88 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.
Advertisement
Advertisement