वृत्तसंस्था/दुबई
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारत शुक्रवारी अबुधाबी येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या गटातील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविऊद्ध प्रथम फलंदाजी करणे आणि 20 षटकांचा पुरेपूर वापर करणे पसंत करेल. सुपर 4 साठी आधीच पात्र ठरल्याने आणि रविवारच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविऊद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर लक्ष ठेवून भारताच्या फलंदाजीला या लढतीचा सराव सामन्यासारखा उपयोग करून घेता येईल.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताला कमी धावसंख्येचा पाठलाग करावा लागलेला असल्याने ओमानविरुद्धची लढत ही एक उत्तम संधी आहे. अभिषेक शर्माने दोनदा धमाकेदार सुऊवात केलेली असली, तरी शुभमन गिलला थोडा जास्त वेळ फलंदाजी करायची इच्छा असू शकते. कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानविऊद्ध चांगली कामगिरी केली, परंतु तिलक वर्माला फलंदाजीसाठी अधिक वेळ मिळावा अशी त्याची इच्छा असेल. हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या मधल्या फळीतील खेळाडूंना स्पर्धेचा खरा आठवडा सुरू होण्यापूर्वी काही चांगली फटकेबाजी करायची असेल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला, तर सात दिवसांत त्यांच्याकडून चार सामने खेळले जातील. भारतीय गोलंदाजांची गुणवत्ता इतकी चांगली आहे की, जर ओमानने प्रथम फलंदाजी केली, तर सामना लवकर संपण्याची शक्यता आहे. कारण जतिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती यांच्यासारख्या गोलंदाजांसमोर टिकण्याची फारच कमी शक्यता आहे.
ओमानची पाकिस्तान आणि यूएईविऊद्धच्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजी स्पष्टपणे सर्वोत्तम नव्हती. पराभव स्वीकारावा लागलेल्या सामन्यांत पाठलाग करताना 67 आणि 130 या दोन धावसंख्या चांगले चित्र दाखवत नाहीत. त्यांची अशी दुर्दशा झाली की, दोन सामन्यांमध्ये एकाही फलंदाजाला वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत 30 चा स्तर ओलांडता आला नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कदाचित सुपर फोरच्या आधी मुख्य शस्त्र जसप्रीत बुमराहला थोडा आराम देण्याच्या व्यतिरिक्त खेळाडूंच्या क्रमवारीत जास्त प्रयोग करू इच्छित नसतील. फक्त चार षटके गोलंदाजी करायची असल्याने आणि पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यानंतर चांगली विश्रांती मिळालेली असल्याने कदाचित बुमराहलाही ब्रेक नको असू शकतो. पण बुमराहसारख्या मुख्य शस्त्रांच्या बाबतीत जास्त काळजी घेणे भाग आहे.
यामुळे संघाला अर्शदीप सिंगला तपासण्याची संधी मिळेल, ज्याला अष्टपैलू खेळाडूंना संघात ठेवण्याकडे कल आणि क्रमांक 8 पर्यंत फलंदाजीची खोली ठेवण्याचा हव्यास यामुळे संधी मिळालेली नाही. जर गंभीरला थोडे अधिक प्रयोगशील व्हायचे असेल, तर तो हर्षित राणालाही खेळवू शकतो आणि वऊण किंवा कुलदीप यांच्यापैकी एकाला विश्रांती देऊ शकतो. हा एकमेव असा सामना असेल जिथे सूर्यकुमार त्याच्या फलंदाजीच्या क्रमात थोडा बदल करू शकतो.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वऊण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
ओमान : जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओदेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.