महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

06:44 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्थ/ गौहत्ती

Advertisement

येथे सुरू असलेल्या गौहत्ती सुपर मास्टर्स 100 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांनी महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

Advertisement

शनिवारी येथे झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात अश्विनी आणि तनिषा या भारतीय जोडीने नेदरलँड्सच्या तृतीय मानांकित जिली आणि सिनेन यांचा 36 मिनिटांच्या कालावधीत 21-12, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना रविवारी खेळविला जाणार आहे.

या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसूदला उपांत्यफेरी पार करता आली नाही. उपांत्यफेरीच्या सामन्यात थायलंडच्या चेवॉनने बनसूदचा 21-12, 21-14 असा पराभव केला. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा व द्रुव कपिला यांना सिंगापूरच्या टेरी आणि जेसिका यांच्याकडून 21-18, 21-15 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत भारताच्या रुबेनकुमार आणि हरिहरन यांचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article