अश्व ठरला गावाचा महापौर
मिळाले आहे स्वतःचे ऑफिस
लोकशाही कुठल्याही देशासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. लोक स्वतःचा नेता स्वतः निवडतात. हाच निवडून आलेला नेता लोकांच्या हितासाठी काम करतो. परंतु लोकंनी स्वतःचा नेता म्हणून एका अश्वाची निवड केल्यास काय होईल? ब्रिटनच्या कॉकिंग्टनमध्ये एका अश्वाला महापौर म्हणून निवडण्यात आले आहे. लोकांनी या अश्वाला सर्वसहमतीने निवडले आहे. या अश्वाने येथील लोकांच्या मनात स्थान मिळविले आहे. लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करत त्याला विजय मिळवून दिला आहे. आता हा अश्व महापौरांच्या कार्यालयात जाऊ लागला आहे.
या अश्वाचे नाव पॅट्रिक असून तेथील लोक त्याला थेरेपी पोनी म्हणूनही संबोधितात. पॅट्रिकला बियर अत्यंत पसंत आहे. यापूर्वी तो पबमध्ये राहत होता. पॅट्रिकने निवडणुकीत अनेक लोकांना पराभूत करत महापौराचे पद मिळविले ओ. आता पॅट्रिकचे स्वतःचे ऑफिस आहे. पॅट्रिकच्या विजयाने त्याला लोकांमध्ये चर्चेचा विषय केले आहे. अखेर हा अश्व लोकांच्या गरजांची काळजी कशी घेणार असा प्रश्न लोकांना आता पडत आहे.
ग्रामस्थांचे समर्थन
पॅट्रिकच्या विजयात ग्रामस्थांचे मोठे योगदान राहिले. लोकांनी पॅट्रिकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. महापौर होण्यापूर्वी पॅट्रिक गावातील एका पबबाहेर दिसून यायचा. पॅट्रिकला बियर पिणे अत्यंत पसंत आहे. त्याचा मालक त्याला बियर प्यायला देतो. गावातील द ड्रम नावाच्या लोकल पबमध्ये त्याला अत्यंत पसंत केले जाते. महापौर होण्यापूर्वी तो या गावाचा हिरो ठरला होता. त्यानंतर निवडणुकीत पॅट्रिकला लोकांनी विजयी केली आहे.
लोकांच्या पसंतीस उतरलेला
पॅट्रिकला गावातील सर्व लोक पसंत करतात. त्यांच्या चांगल्या वर्तनामुळे तो लोकांच्या मनात घर करून आहे. कोरोनादरम्यान पॅट्रिकने अनेक जणांना नैराश्यापासून वाचविले. पॅट्रिक आमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल अशी लोकांना अपेक्षा आहे. याच अपेक्षेपोटी त्यांनी त्याची महापौर म्हणून निवड केली आहे. पॅट्रिकचा बहुतांश वेळ लोकांसोबत जातो. तो अनेक रिकव्हरी ग्रूप्स, हॉस्पिटल्स आणि मेंटल हेल्थ वॉर्ड्सचा हिस्सा आहे. थेरेपीद्वारे तो लोकांची मदत करत असतो.