Sangali News: क्रेटा कारमध्ये सापडली ४ लाख २० हजारांची रक्कम
रकमेबाबत पुरावे नसल्याने रक्कम जप्त
आष्टा: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने कोल्हापूर रस्ता आष्टा येथे दैनंदिन वाहन निरीक्षण करते वेळी तपासणी पथकास चार लाख वीस हजार रुपयांची रक्कम मिळून आली. या रकमेबाबत कसलेही पुरावे नसल्याने एवढी मोठी रक्कम जप्त करण्यात आली.
तपासणी पथक प्रमुख संगणक अभियंता संदिप सरनाईक, पोलिस हवालदार विजय रजपूत व महसूल सहाय्यक रणजीत भोई यांनीही कारवाई केली. क्रेटा गाडी क्र. MH 09 FB ३०३८ वर ची तपासणी करत असताना सदर वाहनामध्ये रुपये ४,२०,०००/-रुपये इतकी पुरावा नसलेली रक्कम आढळून आली. सदर रक्कमेबाबत पथक प्रमुख यांनी विचारणा
केली असता.
वाहन चालक यांनी सदर रक्कमेचा कोणताही पुरावा नसलेबाबत सांगितले वरुन सदर रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर तहसिलदार, आष्टा राजशेखर लिंबारे, पोलिस निरीक्षक आष्टा, आचार संहिता कक्ष प्रमुख श्रीकृष्ण पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत पंचनामा करून सदर जप्त केलेली रक्कम शासकीय कोषागारामध्ये जमा केली. निवडणूक निरिक्षक श्रीमती किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन दर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.