महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अशोक तंवर यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

06:31 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी भाजपला धक्का :

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. तर अशा स्थितीत मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक तंवर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. महेंद्रगढ जिल्ह्यातील बवानिया गावात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तंवर यांनी काँग्रेसचे सदस्यत्व प्राप्त केले आहे. तंवर हे सिरसाचे खासदार तसेच हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांच्यासोबत वाद झाल्याने 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तंवर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

अशोक तंवर यांनी 5 ऑक्टोबर 2019 रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 22 महिन्यांपर्यंत ते आम आदमी पक्षात सक्रीय राहिले. त्यानंतर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याने तंवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तंवर हे हरियाणातील प्रमुख दलित नेते म्हणून ओळखले जातात. तंवर पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने भाजपला काही प्रमाणात फटका बसू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांमध्ये देशात मोठे परिवर्तन घडून आले आहे. भारताला पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र करण्यासाठी केल्या जात असलेल्या कामांमुळे प्रभावित झालो असल्याचे तंवर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना म्हटले होते.

कुमारी शैलजा यांना केले लक्ष्य

अशोक तंवर यांनी काही दिवसांपूर्वी कुमारी शैलजा यांच्यावर निशाणा साधला होता. शैलजा यांनी माझी पाठराखण करण्याचे कष्ट कधीच घेतले नाहीत. परंतु आता त्यांचाच काँग्रेसमध्ये अपमान होत असून हा प्रकार निंदनीय आहे. शैलजा यांच्या विरोधात ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर होत आहे, तो चुकीचा आहे. आता परिस्थिती बदलली असून मी त्यांच्यासोबत उभा राहणार असल्याचे तंवर यांनी म्हटले होते.

हु•ा यांचे विरोधक

अशोक तंवर हे 5 वर्षे 8 महिन्यांपर्यंत हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत तंवर यांच्या पसंतीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू झाला होता. 2019 मध्ये निवडणुकीपूर्वी हा वाद चिघळल्याने तंवर यांना काँग्रेसला रामराम ठोकावा लागला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article