कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशिकाचं स्वप्न... भारतीय सीनियर फुटबॉल संघात खेळायचे

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भविष्यात भारतीय सीनियर फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व कराचयं. आशिका गडेकर हे गोव्यातील फुटबॉल वर्तुळात नवीन नाव नाहीयं. एक चतुरस्त्र आणि महिला गोलरक्षणातील एक भिंत म्हणून आशिकाचं नाव आता राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल क्षेत्रातही झाले आहे.

Advertisement

24 वर्षीय हळदोणेतील सेंट मायकल वाडा येथे राहणारी आशिका सध्या राज्यात ग्रासरूट फुटबॉलचा भक्कम पाया घातलेल्या आणि विविध वयोगटातील संघांचा समावेश असलेल्या सेसा फुटबॉल अकादमीसाठी खेळत आहे. राज्यातील कित्येक फुटबॉल प्रशिक्षकांनी आशिकाच्या गोलरक्षणाची तारीफ केली आहे. आशिका गोलमध्ये असली तर त्या संघाचा खेळ नेहमीच बहरलेला असतो. कारण एवढचं की त्यांच्यावर गोल होण्याची जास्त चिंता नसते. अभेद्य गोलरक्षण ही आशिकाची भक्कम बाजू, हे वेळोवेळी दिसून आले आहे.

Advertisement

अंजुणास्थित हरिश्चंद्र व हर्षा गडेकरच्या या कन्येने फुटबॉलच्या मैदानावर पहिले पाऊल टाकले ते वागातोरच्या सेंट मायकल स्कूलमध्ये पाचवीत असताना. तिला फुटबॉलची आवड निर्माण झाली ती तिची बहिण रिमा फुटबॉल खेळ खेण्त असताना. तिची बहीण रिमाही एक उत्कृष्ट गोलरक्षक आणि राज्याचे विविध वयोगटात, सीनियर आणि विद्यापीठ स्तरावरही खेळलेली. तिच्यामुळेच मी फुटबॉलमध्ये आणि प्रामुख्याने गोलरक्षणात उतरले असे अभिमानाने आशिका सांगते.

‘फुटबॉल हे माझं जीवन आहे. तिच्याशिवाय मी जगू शकत नाहीयं. म्हापसाच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतलेल्या आशिकाने गोव्याचे 14, 15, 18, 19 तसेच सीनियर महिला फुटबॉल संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. गोव्याचे तब्बल पंधरा वेळा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांत प्रतिनिधीत्व केलेल्या आशिकाने देशाचे श्रीलंका व नेपाळात झालेल्या 14 व 15 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धांतही प्रतिनिधीत्व केले आहे. माझ्या पालकांचा पाठिंबाही यासाठी मोलाचा राहिला. माझे प्रशिक्षक आग्नेलो, सावदी लोबो, सॅवेरीन फर्नांडिस, गिरीजादेवी देसाई तसेच मार्गारेट फर्नांडिस व सपार्ट स्टाफ यांनी माझ्या फुटबॉल खेळात भरपूर मदत व मार्गदर्शन केले आहे, असे अभिमानाने आशिका सांगते.

सेसा फुटबॉल अकादमी, तुयें एफसी, चर्चिल ब्रदर्स, कॅम्प एफसी, बीदेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लब, बेंगलोर ब्रेव्हस् एफसी, पणजी फुटबॉलर्स व स्पोर्टिंग क्लुब दी गोवा या भारतातील संघांव्यतिरिक्त इंडियन वुमन्स लीगमध्ये तिने पणजी फुटबॉलर्स, बीदेश इलेव्हन, चर्चिल ब्रदर्स, सेसा व तुयें एफसीचे प्रतिनिधीत्व केले आहे.

माजी फुटबॉल गोलरक्षक संदीप नाईक यांना आपले ‘मेंटर’ मानणाऱ्या आशिकाला गोलरक्षणात प्रतिष्ठतेचा ‘गोल्डन ग्लोव्ह’ हा पुरस्कार पहिल्यांदा 2017 फुटबॉल हंगामात वेदांता वुमन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मिळाला. त्यानंतर 2018मध्ये सुब्रोतो चषक तसेच यंदा झालेल्या ‘वावऱ्याड्यांचो इश्ट’ या महिला फुटबॉल स्पर्धेत मिळाला. मेंटर संदीप सरांमुळे आपण कित्येक शिखरे पार करू शकले, असे अभिमानाने आशिका सांगते. त्यांचं मार्गदर्शन आपणाला नेहमीच लाभले आहे. असे आशिका म्हणाली. अंजुणातील फुटबँलप्रेमीं तसेच पंचायतीनेही मला वेळोवेळी पाठिंबा दिला व मला गौरविले.

आशिकाने 2014 मध्ये पश्चिम बंगालात झालेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा गोव्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत आशिकाच्या कामगिरीची दखल घेऊन तिला भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय संघ निवड शिबिरासाठी बोलविले आणि तिची भारतीय संघात निवडही झाली. दहावीत असताना गोव्याच्या सीनियर फुटबॉल संघात आलेल्या आशिकाचा त्यानंतरचा स्पर्धा आलेख नेहमीच उंचावललेला बघायला मिळत आहे.

सीनियर महिला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझं स्वप्न आहे. एकदिवस माझं हे स्वप्न प्रत्यक्ष साकारणारच, असा आत्मविश्वास आशिकाने व्यक्त केला. कोविडच्या पूर्वी काही दिवस मला सीनियर फुटबॉल संघ निवडीसाठी ‘कॉल’ आला होता. मी जाण्यासाठी तयारीही केली होती. मात्र ती अखेरच्या क्षणी रद्द झाली आणि याचं शल्य अजुनही मला दुखावत आहे, असे सध्या रेवोडा मैदानावर अध्ययान फाऊंडेशनच्या माध्यम्यातून लहान मुलांना प्रशिक्षण देणारी आशिका म्हणाली. आशिकाने पेडे बूम स्पोर्ट्स क्लबलाही प्रशिक्षण दिले असून तिने प्रशिक्षण दिलेल्या संघाने जीएफएच्या डिव्हीजन-3 फुटबॉल स्पर्धेचे जेतेपदही मिळविले आहे.

आशिका गडेकरचा सहभाग आणि कामगिरी

-संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article