Ashadhi Wari 2025: माऊलींचं दर्शन जलद मिळणार, 'हरी विठ्ठला'च्या घोषात टोकन दर्शन प्रणालीस प्रारंभ
कालांतराने ऑफलाईन पद्धतीने देखील बुकिंग सुविधा उपलब्ध होईल
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद आणि तुलम दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीमार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा प्रारंभ रविवारी पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या घोषात श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पंढरपूर येथे करण्यात आला.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विठ्ठल नामाच्या जयघोषात टोकन दर्शनाचा प्रारंभ करताना सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्यायिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, टोकन दर्शनासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने बुकिंग उपलब्ध आहे, परंतु कालांतराने ऑफलाईन पद्धतीने देखील बुकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. तथापि, टोकन दर्शन प्रणालीसाठी आवश्यक इनफ्रास्टक्चर म्हणजेच दर्शन हॉल व स्कायवॉक लवकरच शासनाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. त्याबाबत मंदिर समितीचा पाठपुरावा सुरू आहे.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, टोकन दर्शन प्रणालीसाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांनी मोफत संगणक प्रणाली विकसित करून दिली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
टोकन दर्शन प्रणातीची बुकिंगची सुविधा मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जसून त्यासाठी सकाळी १० ते रात्री आठच्या दरम्यान सहा स्लॉट निश्चित करून प्रती स्लॉटमध्ये २०० प्रमाणे एकूण एक हजार २०० भाविकांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत पुरेशा प्रमाणात तज्ञ कर्मचारी वर्ग नियुक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. टोकन दर्शन प्रणालीच्या प्रारंभा दरम्यान टोकन घेऊन आलेल्या वारकरी भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने
मूळ दर्शन रांगेतील भाविकांना विलंब होणार नाही
"मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच वारकरी माविकांना सुलभ व जतद दर्शन होईल यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. या चाचणीमध्ये काही त्रुटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल. याशिवाय, मूळ दर्शनरगितील भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे."
- गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर