महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।।

10:34 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालुक्यात आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी : विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी : गावागावांत भजन, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन 

Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

तालुक्यात बुधवारी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. तालुक्मयाच्या विविध गावांत असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरासह अन्य मंदिरांमध्ये दिवसभर विठू नामाचा गजर झाला. या मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. यामुळे अवघा तालुका विठ्ठल नामाच्या जयघोषात दंग झाला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरांमध्ये विठ्ठल रखुमाई मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली होती. या मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती.

पंढरीची वारी आहे माझे घरी !

आणिक न करी तीर्थव्रत !!

 व्रत एकादशी करीन उपवासी !

गाईन अहर्निशी मुखी नाम  !!

नाम विठोबाचे घेईन मी वाचे !

बीज कल्पांतीचे तुका म्हणे !!

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तालुक्मयातील हजारो वारकरी पंढरीची वारी अगदी नित्यनेमाने करतात. तालुक्मयातील भाविक गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पायी दिंडीतून पंढरपूरला गेलेले आहेत. तर मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वे व खासगी वाहनातून पंढरपूरला गेले आहेत. पंढरपूर नगरीत पोहोचल्यानंतर ‘हा आनंद सुख सोहळा स्वर्गी नाही’ याची प्रचिती आली असल्याचे काही वारकऱ्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीचे व्रत भाविकांनी केले. दिवसभर उपवास करून विठू नामाचा गजर करण्यात आला. गळ्यात माळ, हातात टाळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर पताका, मनी शुद्ध भाव व मुखाने विठ्ठल नामाचा जयघोष करत तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी गावात दिंडी काढल्या.

वर्षानुवर्षे चालत आलेली, संतांनी घालून दिलेली परंपरा, टिकवण्यासाठीची आस वारकऱ्यांमध्ये दिसून येते. वारी ही भक्तीप्रेमाची अनुभूती घेण्याची सहजस्थिती आहे. ‘माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत पंढरपूरला जाण्याची एक वेगळीच आस संतांना असते. दिंडीच्या माध्यमातून ऊन-पाऊस याची तमा न बाळगता, ज्ञानोबा माउलीचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. बारा ते पंधरा दिवसाचा दिंडीचा पायी प्रवास करून वारकरी गेल्या दोन दिवसांपूर्वी पंढरी नगरीत दाखल झाले आणि चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतले.

तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरे आहेत. आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच पुष्पहारांनी सजावटही करण्यात आली. ‘उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा’ असे म्हणत या मंदिरांमध्ये बुधवारी पहाटे काकड आरतीला सुऊवात करण्यात आली. दिवसभर गावात टाळ मृदुंगाच्या गजरात दिंड्या, भजनाचे कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ, प्रवचन व मंदिरांमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम झाले.

बेळगुंदी मंदिरात काकडारती

बेळगुंदी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवारी पहाटे काकड आरती करण्यात आली. विठ्ठल रखुमाई मूर्तीची आषाढी एकादशीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. यावेळी गावातील महिला व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. बेळगुंदी मुख्य रस्त्याच्या बाजुलाच मंदिर असल्यामुळे परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

किणयेत जागर भजन, कीर्तन, प्रवचन

किणये गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे काकड आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी भजन कार्यक्रम पार पडला. बहाद्दरवाडी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ब्रह्मलिंग पिंडीची विठ्ठलाच्या स्वरूपात विशेष पूजा करण्यात आली. काकड आरती, सायंकाळी हरिपाठ व जागर भजनाचा कार्यक्रम झाला.

नावगेसह अन्य गावांत विद्यार्थ्यांची दिंडी-आध्यात्मिक कार्यक्रम

नावगे गावातील वारकरी संप्रदाय व प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी बिजगर्णी, राकसकोप, इनाम बडस, बाकनूर, बेळवट्टी, मच्छे, पिरनवाडी, देसूर, नंदीहळ्ळी, राजहंसगड, बामणवाडी, बाळगमट्टी, झाडशहापूर, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये गावामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article