महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यथा राजा तथा प्रजा...

06:56 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तरार्ध

Advertisement

प्रत्येक जण नेता म्हणून जन्माला येतोय. असा कार्यकर्ता राजकारणात प्रमुखपदी आला तर मात्र भल्या भल्यांची गाळण उडते. हे सध्याच्या चित्रावरून दिसून येतेय. तो स्वत: काम करत असल्याने सगळी प्रजा कामाला लागलीए. पण काही चुकार आहेतच. ‘खाओ, पियो, मजा करो’ असं म्हणणारे मंत्री, लोकांना केव्हाही, कुठेही दारू मिळू शकेल यासाठीचे परवाने देतोय, दिल्लीच्या कोट्याधिशांना वीज, पाणी, मोफत देतोय. आणि स्वत:च त्या सगळ्या भ्रष्टाचारात नखशिखांत बुडला जातोय. काही राज्यांत.. मारा फोडा आणि राज्य करा या बळाच्या जोरावर काहीही मिळवता येतं आणि कसंही वागलं तरी लोक तुम्हाला विरोध करू शकत नाहीत हे तंत्र शिकवणारे आमच्या इथले अनेक नेते पुढच्या पिढीचं किती नुकसान करतायत हे लक्षात येतं. अनेक ठिकाणी धान्य मोफत वाटलं जातं, मोफत कपडे दिले जातात किंवा मोफत घरे वाटण्याची नाटकंसुद्धा केली जातात. परंतु अशा लोकांना फक्त राजकीय खेळापुरतं वापरलं जातं. नंतर मात्र त्यांच्या पदरात काहीही पडत नाही, हेच वास्तव आहे. म्हणूनच यथा राजा तथा प्रजा ही म्हण मनोमन पटते. आम्हाला जरी चांगला राजा मिळाला म्हणजे जनतेला शिक्षण देणारा, जनतेला घर बांधून देणारा, जनतेला आरोग्य आणि स्वच्छता सेवा पुरवणारा.तरीही अशी चांगली माणसं या भ्रष्टाचारी लोकांना नको असतात. त्यांना हटवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. लोकांसाठी जगणारा राजा लोकांना आवडतो. आपल्यातला तो एक वाटतो आणि हळूहळू समाजाला देखील शिस्त लागायला लागते. परंतु मुठभर बेशिस्त वागणारे, भ्रष्टाचार करणारे आणि मनमानी करणारे लोक मात्र अशा वेळेला अडचणीत येतात. तोंडाने एक बोलायचं आणि वागायचं वेगळंच असं असणारे लोक सर्वधर्मसमभाव, अहिंसा, मागासलेल्यांचे कैवारी अशा छान छान गोष्टींचा कायम गजर करतात. परंतु स्वत: मात्र प्रत्यक्षात तसं वागत नाहीत. एका धर्माला सवलती द्यायच्या आणि दुसऱ्या धर्माला पायाखाली चिरडायचं असं वागणारे अनेक नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी जगत असतात. अशावेळी राजा कसा असावा याची व्याख्या करताना जो राजा देशाचा विश्वस्त म्हणून काम पाहतो, प्रगतीच्या वाटा दाखवतो तो उत्तम  ठरतो, पण देश आपण विकत घेतलाय किंवा त्याचे मालक आहोत, आपण वाटेल ते करू शकतो अशा थाटात वागणाऱ्यांना मात्र लोक भिरकावून देतात. माणसं आणि राष्ट्र प्रथम हे तत्व जे लोक अंगिकारतात ते देशाचं भलंच करतात. याचाच प्रत्यय सध्या तरी येतोय. म्हणूनच असाच राजा आम्हाला कायम लाभावा हीच देवाचरणी प्रार्थना करूया.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article