कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वर्षभरात तब्बल 80 हजार अतिरक्तदाबाचे रुग्ण

11:14 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वेक्षणातील जिल्ह्यातील आकडेवारी : मधुमेहाचाही वाढता प्रभाव 

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात मधुमेह व अतिरक्तदाबाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. दरवर्षी रुग्णसंख्या वाढतच चालली असून त्यामुळे साहजिकच नागरी समाजाची चिंता वाढली आहे. केवळ वर्षभरात तब्बल 80 हजार अतिरक्तदाबाचे व 16 हजारहून अधिक मधुमेही आढळून आले आहेत. आरोग्य खात्याकडून संसर्गजन्य रोगराईच्या नियंत्रणासाठी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघडकीस आली आहे. 30 वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 2023-24 मध्ये 2 लाख 9 हजार 097 मधुमेही तर 2 लाख 38 हजार 719 अतिरक्तदाबाचे रुग्ण आढळून आले आहेत. 2024-25 च्या मार्चपर्यंत 80 हजार 163 अतिरक्तदाबाचे तर 16 हजार 766 मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

सर्वेक्षणादरम्यान 21 लाख 1 हजार 250 हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये एकूण 3 लाख 18 हजार 882 जण अतिरक्तदाबाचे रुग्ण व 2 लाख 25 हजार 863 मधुमेही आढळून आले आहेत. व्यसन, मानसिक ताणतणाव, खाण्यापिण्यातील बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संसर्गजन्य रोगराई थोपविण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृतीबरोबरच सर्वेक्षणही करण्यात आले आहे. रुग्णांना मोफत उपचारही पुरवले जातात. 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी केली जात आहे. रक्तदाब, मधुमेह, तीन प्रकारच्या कॅन्सर तपासण्या केल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे, आशा कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय दोडमनी यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article