महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा युवा आघाडीच्या मॅरेथॉन स्पर्धेत आर्यन पाटील विजेता

10:26 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवतींमध्ये क्रांती वेताळ विजेती : वयस्कर गटात सोमनाथ वेताळ प्रथम : विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरव : स्पर्धकांचा लक्षणीय सहभाग

Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

Advertisement

हिंडलगा येथील युवा आघाडी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दसऱ्यानिमित्त 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 13 रोजी खुल्या गटात पाच किलोमीटर मॅरेथॉन तसेच गावमर्यादित विविध गटात धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. खुल्या गटातील पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत आर्यन जी. पाटील (माडवळे ता. चंदगड) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा परशराम कुणगी (तुमरगुद्दी), तिसरा वैजनाथ नाईक (चंदगड) हे विजेते ठरले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष विनायक बा. पावशे तर उद्घाटक माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी प्रास्ताविक केले.

युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. स्पर्धांचे उद्घाटन माजी आमदार मनोहर किणेकर, ग्रा.पं. सदस्य डी. बी. पाटील, निवृत्त अधीक्षक उत्तम पाटील, राजू कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम .चौगुले, डी. बी. पाटील, माऊती पावशे, उत्तम पाटील यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.  प्रायोजक म्हणून बेळगाव ग्रामीण महिला मल्टिपर्पज सोसायटी हिंडलगा यांचे योगदान मिळाले. महिला गटासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांचे नियोजन संस्थेच्या चेअरमन स्नेहा तरळे, व्हा. चेअरमन राजश्री अगसगेकर, संचालिका रूपा कुपेकर, नयन अगसगेकर, कविता पावशे, साक्षी काकतकर, रेखा पावशे यांनी केले.

युवा गटातील स्पर्धांचे नियोजन अनिल हेगडे, सुनील पावशे, श्रीकांत जाधव, अर्जुन जकानी, सतीश नाईक, किरण कुडचीकर, उदय तु. नाईक, मोहन पावशे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आतापासूनच सराव करावा, असे आवर्जून सांगितले. अध्यक्षीय मनोगत विनायक पावशे यांनी केले. सूत्रसंचालन नागेश किल्लेकर तर आभार निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी मानले. या स्पर्धांसाठी स्मृतिचिन्ह निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन व वयस्कर स्पर्धेतील दुसऱ्या नंबरचे विजेते चंद्रकांत कडोलकर यांनी दिले. याप्रसंगी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत मंडोळी येथील दहा वर्षाचा मनीष दळवी याने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.

स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. विजेते पुढीलप्रमाणे: खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत-अनुक्रमे आर्यन पाटील, प्रशांत कुणगी, वैजनाथ नाईक, संभाजी नाईक, माऊती डोंबले यांनी नंबर पटकावले. युवती गटात क्रांती वेताळ, रसिका पाटील, आचल नार्वेकर, विद्या बिर्जे तर गाव मर्यादित स्पर्धेत मंथन नाईक, संकेत सांगावकर, आशिष अगसगेकर, युवती गटात संचिता अगसगेकर, निकिता पावशे, सृष्टी नाईक यांनी नंबर पटकावले. माध्यमिक आठवी ते दहावी गटात रोहन कोकितकर, प्रसाद डोंबले, स्वयंम लाड व मुलींच्या गटात मनस्वी  मेणजे, वैष्णवी  मेणजे, प्रतीक्षा सांगावकर, पाचवी ते सातवी विभागात ऊद्रा अगसगेकर, साहिल सांगावकर, श्रेयश कडोलकर, मुलींच्या गटात मीरा सांगावकर, समृद्धी किणेकर, श्रेया देवगेकर, पहिली ते चौथी गटात भगतसिंग गावडे, सर्वेश पावशे, पृथ्वीराज मेणजे, मुलींच्या गटात-स्वरा बेळगुंदकर, आराध्या कुपेकर, प्राची मेणजे, आदिती सांगावकर यांनी नंबर पटकावले. वयस्कर गटात सोमनाथ वेताळ, चंद्रकांत कडोलकर, सुरेश देवरमणी, सुरेश सांगावकर या धावपटूंनी क्रमांक पटकावले. विजेत्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्रा.पं. सदस्य यल्लाप्पा काकतकर, मोहन नाईक, प्रभाकर काकतकर, मकरंद लाड व युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article