For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरविंद केजरीवालांची ‘तिहार’मध्ये वापसी

06:42 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरविंद केजरीवालांची ‘तिहार’मध्ये वापसी
Advertisement

आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजघाटावर नमन : कार्यकर्त्यांनाही केले संबोधित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारी तिहार तुऊंगात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. आत्मसमर्पण करण्यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल राजघाट येथे नमन केले. तसेच पॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात गेले. तसेच कारागृहाच्या दिशेने जाण्यापूर्वी पक्षनेते, कार्यकर्ते आणि दिल्लीवासियांना उद्देशून संबोधनही केले.

Advertisement

तिहार कारागृहात परतण्यापूर्वी केजरीवाल यांनी रविवारी सकाळी ‘एक्स’वर हिंदीत ट्विट केले होते. ‘माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार. आज मी तिहार कारागृह प्रशासनासमोर शरण जाईन. मी दुपारी 3 वाजता घरून निघेन. सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घे ण्यासाठी पॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहारला जाईन. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. तुऊंगात तुम्हा सर्वांची मला काळजी वाटेल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवाल तुऊंगातही सुखी होतील. जय हिंद!’ असा संदेश सोशल मीडियावर लिहिला होता.

घरातून बाहेर पडताना अरविंद केजरीवाल यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि मुलांना मिठी मारली. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. अरविंद केजरीवाल, आप नेते संजय सिंह यांच्यासह इतरांनी हनुमान मंदिरात पूजा केली. याचदरम्यान, ‘आज मुख्यमंत्री महोदय पुन्हा तुऊंगात जात असले तरी आम्हाला आशा आहे की ते पुन्हा तुऊंगातून परत येतील...’ असे आप नेते गोपाल राय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अरविंद केजरीवाल जेल क्रमांक 1 मधून तिहार तुऊंगात पोहोचले. तिहार तुऊंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल तिहार तुऊंगात दाखल होताच प्रथम त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीमध्ये साखरेची पातळी, बीपी आणि वजन तपासण्यात आले. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.