मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे ‘आर्टिस्ट्री शो’
13 ऑक्टोबरपर्यंत चालणार : शोमध्ये आधुनिक-पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंडतर्फे 10 ऑक्टोबरपासून ‘आर्टिस्ट्री शो’ बेळगावच्या शोरुममध्ये सुरू आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शोमध्ये आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन मांडले आहे. डायमंड ज्युवेलरीबरोबरच रॉयल पोलकी ज्युवेलरी, पर्शिया जेमस्टोन ज्युवेलरी, हँडक्राफ्टेड ज्युवेलरी आदी नमुन्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दसरा-दिवाळीचे औचित्य साधून बेळगावमध्ये प्रदर्शन सादर करताना अतिशय आनंद होत आहे. ग्राहकाला गुणवत्ता, शुद्धता व योग्य दरामध्ये हे दागिने मिळणार असल्याचे मलाबारचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी सांगितले. या शोच्याप्रसंगी नृत्य कलाकार नितू कोसंदर, मेकअप आर्टिस्ट अक्षता टुबाकी, देवकी पवार, शोरुमचे प्रमुख लिजेश के. जे., असिस्टंट हेड आशिष मॅथ्यू, मॅनेजर सूरज अणवेकर, सेल्स मॅनेजर अब्दुल करीम आदी उपस्थित होते.