कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोग
सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते, हे सामान्यज्ञान प्रत्येकाला आहे. मात्र, ही आकाशस्थ प्रक्रिया नैसर्गिकपणे व्हावी लागते. याचा अर्थ अशा की आपण चंद्राला आपल्या इच्छेनुसार सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आणू शकत नाही. अर्थात सूर्यग्रहणाचे एक निश्चित गणित असते आणि ते पृथ्वी आणि चंद्र यांच्या स्वत:भोवती आणि सूर्याभोवती परिभ्रमण करण्याच्या गतीवर अवलंबून असते. सध्या युरोपिन अवकाश संशोधन संस्थेकडून ‘कृमित्र’ सूर्यग्रहण घडविण्याचे प्रयोग केले जात आहेत. असे कृत्रिम सूयग्रहणाच्या माध्यमातून सूर्याच्या सर्वात बाह्या असणाऱ्या प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास ही संस्था करीत आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावरचे तापमान साधारणत: 5 हजार 500 डिग्री सेंटिग्रेड इतके असते. तर बाह्या प्रभामंडळाचे तापमान 20 लाख डिगी सेंटिग्रेड इतके असू शकते. तथापि, हे प्रभामंडळ केवळ खग्रास सूर्यग्रहणातच दिसू शकते. त्यामुळे या प्रभामंडळाचा किंवा करोनाचा अभ्यास करण्यासाठी असे सूर्यग्रहण होण्याची प्रतीक्षा करावी लागते. खग्रास सूर्यग्रहण घडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे कृत्रिम सूर्यग्रहण घडवून हा अभ्यास केला जात आहे. यासाठी ही संस्था दोन उपग्रहांचा उपयोग करीत आहे. हे दोन्ही उपग्रह सूर्याभोवती 1.27 लाख किलोमीटर प्रतीतास या वेगाने फिरत आहेत. त्यांच्यात ‘अलाईनमेंट’ घडवून खग्रास सूर्यग्रहण घडविले जात आहे. अर्थातच, हे ग्रहण सर्वसामान्यांना दिसू शकणार नाही. ते प्रयोगशाळेतील संशोधकांसाठी आहे. या मार्गाने संशोधक सूर्याच्या प्रभामंडळाचा सखोल अभ्यास विनासायास आणि सातत्याने करु शकणार आहे. हा अभ्यास इतर अनेक संशोधनांसाठी उपयुक्त ठरेल, अशी शक्यता आहे.