For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कृत्रिम बुद्धीमत्ता ठरु शकते धोकादायक

06:41 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कृत्रिम बुद्धीमत्ता ठरु शकते धोकादायक

पंतप्रधान मोदी यांचे बिल गेटस् यांना यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रतिपादन, भारताच्या प्रगतीचा मांडला लेखाजोखा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुयोग्य प्रशिक्षण आणि जनजागृती नसेल तर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान धोकादायक ठरु शकते, असे महत्वपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक बिल गेटस् यांनी शनिवारी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेसह अनेक विषयांवर आपली मते मांडली. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावाही त्यांनी मांडला.

Advertisement

कृत्रिम बुद्धीमत्ता हे तंत्रज्ञान दुधारी शस्त्र आहे. योग्य प्रकारे त्याचा उपयोग केल्यास ते अनेक क्षेत्रांमध्ये लाभादायक ठरु शकते. तथापि, हे तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीने कसे उपयोगात आणता येते, यासंबंधी सर्वसामान्यांना माहिती नसल्यास ते धोकादायक आणि लोकांची फसवणूक करणारेही ठरु शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत केले. यासंबंधी त्यांनी स्वत:चाच अनुभव कथन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गात आहेत आणि नाचत आहेत, असे एका व्हिडीओ चित्रणात दाखविण्यात आले होते. तथापि, प्रत्यक्षात असे काहीही घडले नव्हते. कृमिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या आवाजाची प्रतिकृती बनविण्यात आली होती आणि ते गात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. इतरही अनेक मान्यवरांना अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा फटका बसला आहे, ही बाब त्यांनी मुलाखतीत अधोरेखित केली. तंत्रज्ञानाचा उपयोग तारतम्य राखून करणे का आवश्यक आहे, यावर त्यांनी मुलाखतीत भर दिल्याचे दिसून आले.

Advertisement

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची आवश्यकता

वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रगती होणे आवश्यक आहे. ही प्रगती होण्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणे अनिवार्य आहे. कमी भूमीत अधिक उत्पादन, अन्नधान्यांची नासाडी टाळणे, पाण्याचा उपयोग योग्य तेवढाच करणे, उत्तम बियाण्यांची निर्मिती इत्यादी बाबींवर भर देणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरु शकेल. यामुळे शेती लाभदायक होईल, असे प्रतिपादन त्यांनी या संबंधांमधील प्रश्नांवर केले.

कोरोनाशी संघर्ष आव्हानात्मक

कोरोनाचा कालावधी देशासाठी सर्वाधिक आव्हानात्मक होता. केंद्र सरकारच्या अग्निपरीक्षेच्या या कालावधीत आम्ही धीर न सोडता आत्मविश्वासपूर्वक कार्य केले. अत्याधुनिक संपर्क तंत्रज्ञानाचा उपयोग करुन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असा लसीकरणाचा कार्यक्रम अतिशय कमी कालावधीत हाती घेतला. 250 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देशभरात देण्यात  आल्या. यासाठी देशव्यापी यंत्रणा उभी करण्यात आली. अतिशय थोडक्या वेळात स्वदेशनिर्मित लसीची निर्मिती करण्यात आली. कोरोना काळात आर्थिक आघाडीवरही संघर्ष करावा लागला. पण त्या काळातील योग्य आणि व्यवहारी धोरणांमुळे आम्ही आर्थिक जोखडातून लवकर बाहेर पडलो. विकसीत देशांपेक्षाही अधिक वेगाने आम्ही कार्य केले, अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी मुलाखतीत दिली.

कमीत कमी विश्रांती, अधिक कष्ट

कमी विश्रांती आणि जास्तीत जास्त कष्ट हे आपल्या रक्तातच आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत केले. आपण जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या नेत्यांमधील एक आहात, असा उल्लेख बिल गेटस् यांनी केला होता. त्यावर ते प्रतिक्रिया देत होते. सातत्याने काम करण्याठी लागणारी ऊर्जा केवळ शरीरबळातून येत नाही. जे काम हाती घेतले आहे, त्या कामाशी मी भावनात्मकदृष्ट्या जोडला जातो. ते पूर्ण करायचेच असा निर्धार असतो. या मानसिक बळातून इतके कष्ट करण्याची प्रेरणा प्राप्त होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजचा भारत अधिक भक्कम

आज भारताच्या नागरीकांचा देशावरील विश्वास वाढला आहे. तसेच त्यांचा स्वत:चा आत्मविश्वासही उच्च पातळीवर आहे. देश भक्कम झाल्याशिवाय आपण  बलशाली होऊ शकत नाही, हे त्याला पटले आहे. त्यामुळे येणारा भविष्यकाळ देशासाठी उज्ज्वल असेल याची शाश्वती आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक कार्ये अशी झाली, जी त्यापूर्वीच्या काळात झाली नव्हती, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

भारताचे आंतरराष्ट्रीय महत्व वर्धिष्णू

ड आजच्या भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक महत्व, किंमत

ड गेल्या 10 वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये स्पृहणीय कामगिरी, वेगाने विकास

ड सर्वांना सामावून घेणाऱ्या विकास धोरणावर केंद्र सरकारचा प्रामुख्याने भर

ड पांरपरिक क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान हाच योग्य मार्ग

Advertisement
Tags :
×

.