कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावच्या कला संस्कृतीची ओळख होण्यासाठी कला महोत्सव

06:42 PM Nov 03, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement

बेळगाव प्रतिनिधि - बेळगावच्या कला संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी आणि विद्यार्थी व तरुणाईने कलाक्षेत्रात रस घ्यावा या हेतूने बेळगाव कला महोत्सव आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.रोस्ट्रम डायरीजतर्फे व सपना बुक मॉलच्या सहकार्‍याने हा महोत्सव होणार आहे अशी माहिती रोस्ट्रमचे अभिषेक भेंडीगिरी व सपनाचे व्यवस्थापक रघु यांनी पत्रकार परिषदेत दिली. कला महोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धा तसेच कथालेखन स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धा पूर्णतः विनामूल्य असून सर्वांसाठी खुले आहेत. चित्रकला स्पर्धेसाठी सोळा वर्षाखालील आणि 16 वर्षांमधील असे दोन गट करण्यात आले आहेत स्पर्धकांनी बेळगाव शहर आणि जिल्हा डोळ्यासमोर ठेवून येथील परंपरा ऐतिहासिक वारसा जपणारी स्थळे वास्तू जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती यांच्यासह बेळगावचे वैशिष्ट्य दाखवणारे कोणते चित्र काढावयाचे आहे.पेन्सिल, पोस्टर कलर, वॉटर कलर व चारकोलचा वापर करून चित्र काढता येईल यासाठी सपना बुकतर्फे कार्डसिट देण्यात येणार असून स्पर्धकांनी 30 नोव्हेंबर पूर्वी नाव नोंदणी करावयाची आहे व 10 डिसेंबर पूर्वी आपली चित्रकृती आणून द्यावयाची आहे सर्व चित्राकृती डिजिटल गॅलरी च्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली. त्याचबरोबर स्टोरी बुक अर्थात बाराशे शब्दापर्यंत कथा लेखन करून ती 15 डिसेंबर पर्यंत सपना मध्ये आणून द्यावयाचे आहेत यातील उत्कृष्ट कथा सपनातर्फे प्रकाशित केल्या जाणार आहेत सर्वोत्कृष्ट कथांसाठी दीड लाखांहून अधिक किमतीची बक्षिसे आहेत यासाठी कोणतीही शुल्क नसल्याचे निशिगंधा यांनी सांगितले ही स्पर्धा बेळगाव बाहेरी लोकांसाठी सुद्धा खोली असून अधिक माहितीसाठी 0831- 42 55 499 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#art culture of Belgaum#Art festival#sketchcompitition#socialmedia#storywritting#tarunbharat
Next Article