For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी नगरपरिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन

04:07 PM Dec 31, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी नगरपरिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत तसेच अद्याप ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन देशभरात दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत दिनांक 31/12/2013 रोजी सकाळी ठीक ९ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा अभियान रथाचे आगमन झाले.

सदर कार्यक्रमासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत पानवेकर, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग श्री रवींद्र पत्की, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक श्री मुकेश मेश्राम, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड श्री अजय थोटे, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, सावंवाडी नगरपरिषदचे माजी नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध योजनेचे लाभार्थी तसेच पत्रकार व सावंतवाडी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री प्रशांत पानवेकर हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री सागर साळुंखे यांनी केली. या कार्यक्रमांमध्ये पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत, तसेच उज्वला योजना अंतर्गत विविध लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग श्री रवींद्र पत्की व जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड श्री अजय थोटे यांनी आपल्या विभागांतर्गत असणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. मा. प्रशासक यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजना बद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या विविध योजनांसाठी नवीन लाभार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित योजनेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माहिती संदर्भात चित्रफीत दाखवण्यात आली व योजना बाबतची माहितीपत्रक वाटण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisement
Tags :

.