शहरात उसाची आवक; विविध ठिकाणी विक्री
10:31 AM Nov 13, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात उसाची आवक वाढली होती. लक्ष्मी पूजनादिवशी सर्व व्यावसायिकांकडून पूजन केले जाते. यासाठी ऊस, अंबोती आणि इतर पूजेच्या साहित्याची खरेदी केली जाते. यासाठी शहरातील काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, गोवावेस, सदाशिवनगर, सम्राट अशोक चौक, टिळकवाडी आदी परिसरात उसाची विक्री करण्यात आली. लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ऊस आणण्यात आले होते. पाच ऊस 70 ते 100 रुपयेप्रमाणे विक्री केले जात होते. विशेषत: दुकानदार व इतर व्यावसायिकांकडून पूजेसाठी उसाची खरेदी झाली. लक्ष्मी पूजनादिवशी व्यावसायिकांकडून कारखाने, दुकाने, फॅक्टरी आणि इतर ठिकाणी पूजन केले जाते. पूजेसाठी ऊस ठेवले जातात. त्यामुळे रविवारी शहरात उसाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article