महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशमुर्तीचे आगमन! शनिवारी शहरातील वाहतुक मार्गात बद्दल

05:48 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Arrival of Ganesha
Advertisement

शहरामध्ये शनिवारी (7 सप्टेंबर) सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीने होत असल्याने आणि शहरातील शाहूपुरी (कुंभार गल्ली), गंगावेश पापाची तिकटी (कुंभार गल्ली) व बापट कॅम्प (कुंभार गल्ली) या ठिकाणावरुन गणेशमुर्ती मोठया प्रमाणात खरेदी करुन, गणेशमुर्ती मिरवणूकीने घेवून जाणेसाठी नागरिक वाहने घेवून येत आहे. त्यामुळे श्री च्या मुर्ती मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. मिरवणूक सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी शाहुपूरी (कुंभार गल्ली), पापाची तिकटी (कुंभार गल्ली) आणि व बापट कॅम्प (कुंभार गल्ली) येथील काही मार्ग शनिवारी सकाळी सात वाजलेपासून बंद करण्यात आले आहेत. तर काही मार्ग खुले करण्यात आले आहेत.

Advertisement

बंद करण्यात आलेले मार्ग (शाहूपुरी, कुंभार गल्ली)
शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना नाईक अँन्ड नाईक कंपनी समोर प्रवेश बंद करण्यात आली आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज दिशेने कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) रिलायन्स मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. पार्वती सिग्नल चौक व उमा टॉकीज या दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेशमुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) आयर्विन खिश्चन हायस्कूल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गवत मंडई चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Advertisement

गंगावेश पापाची तिकटी (कुंभार गल्ली)
पापाची तिकटी ते बुरुड गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व वाहनांना पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शाहू उद्यान गंगावेश ते कुंभार गल्ली जाणाऱ्या मार्गावरील सर्व वाहनांना शाहू उद्यान या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर गंगावेश चौक ते पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गावर वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

बापट कॅम्प (कुंभार गल्ली)
शिरोली टोल नाका ते बापट कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने मार्केटयार्ड चौक येथून जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड समोरुन बापट कॅम्प कुंभार गल्लीमध्ये येणारी वाहने परत त्याच मार्गाने न येता. सर्व वाहने रिव्हरसाईड होंडा शोरुम जवळच्या रस्त्याने बाहेर मार्गस्थ होणार आहे.

नो पार्किंग
गवत मंडई येथील श्री नाईकनवरे यांचे निवासस्थान जवळील कॉर्नर चौकापासून सर्व बाजूस 50 मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनाना नो पाकिंग करण्यात आले आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहनाना वगळून)

पार्किंग सुविधा
शाहुपूरी (कुंभार गल्ली) पार्वती सिग्नल चौकाजवळील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलचे पटांगण, शाहूपुरी 4 व 5 वी गल्ली येथे वाहतूकीस अडथळा होणार नाही असे पार्किंग करावे. बापट कॅम्प (कुंभार गल्ली) प्रिन्स शिवाजी विदयामंदिर, शाळा क्र. 32 जाधववाडी, ओम कॉम्प्लेक्स समोरील रिकामी गुरु नानक सोसायटीची जागा

Advertisement
Tags :
Arrival of Ganeshacity on Saturday
Next Article