महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्यकारी संचालक चिटणीस मारहाण प्रकरणी आणखी एकास अटक

01:13 PM Jan 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

अन्य संशयितांचा शोध सुरु, व्हिडीओ फुटेजचा आधार

कोल्हापूर प्रतिनिधी

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांना मारहाण प्रकरणी कसबा बावड्यात दुसऱ्या दिवशीही संशयितांच्या शोधासाठी धरपकड करण्यात आली. गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी डॉ. प्रवीण विश्वास नेजदार (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याला अटक केली. याबाबतची फिर्याद जखमी प्रकाश जयसिंग चिटणीस (वय 49, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. अन्य संशयीतांचा व्हिडीओवरुन शोध सुरु आहे.

Advertisement

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतील वाद आणि ऊस तोडीसाठी विलंब होत असल्याच्या कारणावरून कारखान्याचे कार्यकारी संचालक चिटणीस यांना मंगळवारी सायंकाळी कसबा बावडा येथे बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर जखमी चिटणीस यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यातील आठ संशयितांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. गुरुवारी डॉ. प्रवीण नेजदार या आणखी एका संशयित अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला सोमवारपर्यंत (दि. 8) पोलिस कोठडी मिळाली. या गुह्यातील अन्य संशयितांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिली.

Advertisement

 

Advertisement
Next Article