For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजय सिंग विरोधात अटक वॉरंट

06:36 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजय सिंग विरोधात अटक वॉरंट
Advertisement

► वृत्तसंस्था / सुलतानपूर

Advertisement

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. संजय सिंग यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षाचे आमदार अनूप सांदा आणि अन्य तीन जणांविरोधातही अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

संजय सिंग आणि इतर यांच्याविरोधातील हे प्रकरण 23 वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळी त्यांनी पाणीटंचाईच्या विरोधात निदर्शने आणि रास्तारोको केले होते. त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्याचाही आरोप होता. त्यांना या प्रकरणी 3 महिन्यांचा कारावास आणि 1,500 रुपयांचा दंडही करण्यात आला होता. या शिक्षेच्या विरोधात आरोपींनी अपील केले होते. पण वरीष्ठ न्यायालयातही निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यामुळे सर्व आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. संजय सिंग, अनूप सांदा, कमल श्रीवास्तव, विजय, संतोष आणि सुभाष चौधरी यांच्या विरोधात हे वॉरंट काढण्यात आल्याची माहिती सिंग यांचे वकील रुद्रप्रताप सिंग मदन यांनी पत्रकारांना सोमवारी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.