महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पूजा शर्माला अटक करा

12:25 PM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार डिलायला लोबो आक्रमक

Advertisement

म्हापसा : आगरवाडेकर यांचे घर जमिनदोस्त केल्याप्रकणी बिल्डर पूजा शर्माला अटक करण्यास आपण एक दिवसाचा अवधी पोलिसांना देते. पुजाला पोलीस अटक करीत नसल्यास आम्ही पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसणार असल्याचा इसारा, आमदार डिलायला लोबो यांनी दिला आहे. जोपर्यंत आगरवाडेकर कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत दररोज आम्ही सरपंचासह पंच व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत दररोज आम्ही पोलिसस्थानकावर मोर्चा आणणार आहे. आगरवाडेकर कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, असेही आमदार म्हणाल्या. सरपंच हनुमान नाईक म्हणाले की, आपण सर्वांचे याकामी आभार मानले. रविवारी आम्ही हणजूण पोलीस स्थानकात गेलो. तेथे एफआयआर नोंद करीत नव्हते पण उच्च अधिकाऱ्यांशी आमदार डिलायला लोबोनी संपर्क साधल्यावर हालचाली सुरू झाल्या. याकामी पत्रकारांचे सहकार्य मोलाचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article