For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रवाह समितीची उद्यापासून प्रत्यक्ष पाहणी

12:52 PM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रवाह समितीची उद्यापासून प्रत्यक्ष पाहणी
Advertisement

पाच दिवस म्हादईच्या पात्राचा अभ्यास : गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्रचे प्रतिनिधी

Advertisement

पणजी : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने म्हादईसंदर्भात स्थापन केलेल्या ‘प्रवाह’ अधिकारीणीच्या समितीचे सदस्य उद्या गुऊवार दि. 4 ते 7 जुलै या दरम्यान म्हादईच्या प्रत्यक्ष पात्रावर जाऊन पाहणी तसेच अभ्यास करणार आहेत. त्यासाठी हे प्रतिनिधी आज बुधवारी गोव्यात येत आहेत. गुरुवारी 4 जुलै रोजी ते अगोदर विर्डी महाराष्ट्र येथील संभाव्य धरण प्रकल्पाला भेट देणार आहेत. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार प्रवाहचे हे सदस्य पणजी ते विर्डी येथे जाणार असून त्यानंतर मोराची राय, धनगरवाडी विर्डी आणि अंबडगाव जलसिंचन प्रकल्पाला भेट देऊन रात्री पणजीला परत येऊन मुक्काम करणार आहे.समितीचे पदाधिकारी दि. 5 रोजी सकाळी म्हादईच्या गोव्यातील क्षेत्राची पाहणी करणार आहेत. त्यानुसार सकाळी ही मंडळी पणजीतून कणकुंबीला जातील. तिथून ते सुरल येथील धबधब्याला भेट देतील. त्यानंतर तिथून ते अंजुणे धरणाची पाहणी करतील.

पुढे ही मंडळी वाळवंटी नदीवर उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर उस्ते आणि गांजे या भागाला भेट देतील. त्याचबरोबर सुरल येथून सुरू झालेली म्हादई व तिचा सत्तरी येथील प्रवास याशिवाय केरी, लाडकेचो वझर नदीची पाहणी करून रात्री पुन्हा पणजीला मुक्कामास येतील.  दि. 6 रोजी पुन्हा म्हादईच्या गोव्यातील खोऱ्यामध्ये जाऊन पाहणी करतील. त्यात पणजी ते खांडेपार नदी, ओपा जलशुद्धीकरण प्रकल्प, त्यानंतर कुंभारजुवें खाडी, सारमानसपर्यंत जातील. त्यानंतर आमठाणे धरण येथील पाहणी करून ही मंडळी रात्री पणजीला मुक्कामासाठी येतील. दि. 7 जुलै रोजी म्हादईच्या कर्नाटकातील क्षेत्राची पाहणी समिती करणार आहे. त्यानुसार पणजीतून ही मंडळी बेळगावला जातील. वाटेत कळसा-भांडुरा नाला परिसराची पाहणी करतील. त्यानंतर याच नदीवर प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या जागेची पाहणी करतील. त्यानंतर बेळगावमध्ये रात्री मुक्काम करतील.

Advertisement

बेंगळुरुत 8 रोजी प्रवाहची दुसरी बैठक

दि. 8 जुलै रोजी प्रवाहाचे सदस्य बेळगावतून बेंगळुरुकडे रवाना होतील. तेथे सकाळी 11:30 वाजता म्हादई प्रवाहाची दुसरी महत्त्वाची बैठक होणार आहे. पहिली बैठक दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यामध्ये झाली होती. याच बैठकीत एका निर्णयाद्वारे प्रवाह समितीचे सर्व सदस्य हे तिन्ही संबंधित राज्यांना भेट देऊन म्हादई व त्यावर अवलंबून असलेली यंत्रणा याची पाहणी करतील असा निर्णय झाला होता. त्या निर्णयास अनुसरून प्रवाहाची ही प्रत्यक्ष पाहणी उद्या गुऊवारपासून गोव्यातून सुरु होत आहे.

Advertisement
Tags :

.