For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलीला वाचविण्यासाठी भाजप नेत्याच्या अटकेचा प्लॅन

06:22 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलीला वाचविण्यासाठी भाजप नेत्याच्या अटकेचा प्लॅन
Advertisement

के. चंद्रशेखर राव यांच्या अडचणीत वाढ : फोन टॅपिंग प्रकरणी माजी अधिकाऱ्याचा खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे स्वत:ची मुलगी आणि विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांना ईडीच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला अटक करू पाहत होते. ‘बीआरएस आमदारां’ना कथित स्वरुपात पैशांचे आमिष दाखविल्याप्रकरणी कारवाईची भीती दाखवत केसीआर हे भाजपसोबत तडजोड करू पाहत होते असा खुलासा फोन टॅपिंग प्रकरणी अटकेत असलेल्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

Advertisement

माजी पोलीस उपायुक्त पी. राधा किशन राव यांनी दिलेल्या जबाबानुसार ‘पे•ायाना’ (केसीआर यांना उद्देशून घेतले जाणारे नाव) स्वत:च्या आमदारांना फोडण्याच्या कथित प्रयत्नाप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांना अटक करू पाहत होते. याकरिता एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. संतोष यांना अटक करून भाजपशी तडजोड करण्याची केसीआर यांची इच्छा होती. याचा वापर ते स्वत:ची मुलगी कविता यांना ईडीच्या प्रकरणापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी करणार होते, अशी कबुली आरोपी अधिकाऱ्याने दिली आहे.

काही पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाईस विलंब झाल्याने एक महत्त्वपूर्ण व्यक्ती उच्च न्यायालयात पोहोचला. उच्च न्यायालयाने अटक न करण्याचे आदेश दिले होते. मग हे प्रकरण एसआयटीकडून काढून घेत सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. स्वत:च्या अपेक्षेनुसार काम पूर्ण न झाल्याने पे•ायाना (केसीआर) अत्यंत नाराज होते, असे राधा किशन राव यांनी स्वत:च्या कबुलीत म्हटले आहे. ‘पे•ायाना’ यांचे माझ्यावर मोठे उपकार आहेत, यामुळे मी अधिक खुलासा करणार नाही. पे•ायाना यांनी दोनवेळा मला पदावर नियुक्त केले होते. 2020 मध्ये सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हैदराबाद शहर टास्क फोर्समध्ये मला तैनात केले होते असे राधा किशन राव यांचे सांगणे आहे.

माजी पोलीस उपायुक्ताला फोन टॅपिंग आणि काही कॉम्प्युटर सिस्टीम तसेच अधिकृत डाटा नष्ट केल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाच्या अंतर्गत मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. तर केसीआर यांच्या कन्या कविता यांना ईडीने मार्च महिन्यात दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

Advertisement
Tags :

.