आरोंदा कला , वाणिज्य माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेची विद्यार्थिनी संजना रंगनाथ मातोंडकर ७२.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.सुनंदा उमेश कांबळी ६८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर साक्षी संजय नाईक ६२.१७ टक्के गुण मिळवून तृतीय आली.तसेच तन्मय देवदत्त नाईक हा रिपीटर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.एकूण ६ पैकी ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ज्यूनियर कॅालेजचा सन २०२४ / २५ चा निकाल १०० टक्के लागला आहे.याबद्दल सर्व विद्यार्थीचे प्रशालेचे प्राचार्य सिद्धांर्थ तांबे , आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब,सचिव भाई देऊलकर,खजिनदार रुपेश धर्णे,तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आरोंदा हायस्कूलचे व ज्यूनियर कॉलेजचे शिक्षिका सौ.विद्या कौलापुरे व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.