For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरोही चित्रगारचे यश

10:04 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरोही चित्रगारचे यश
Advertisement

बेळगाव : हरियाणा येथील  सोनीपत येथे  झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबची जलतरणपटू आरोही चित्रगार जैन स्कूल हिने उत्कृष्ट कामगिरी करताना दोन सुवर्ण एक रौप्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. हरियाणा येथील  सोनीपत झालेंल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात 50 मी. बटरफ्लाय, 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात 2 सुवर्णपदके व 200 मी. आय एम मध्ये रौप्य पदक अशी एकूण तीन पदके संपादन केली. आरोही चित्रगार ही आबा  हिंद क्लब ची जलतरणपटू असून तिला एनआयएस जलतरण  प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच आबा क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, हिंद सोशल क्लबचेचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते, स्कूल प्रा. रोहिणी के. बी. व क्रीडा शिक्षिका चांदणी यांचे बहुमोल प्रोत्साहन लागते आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.