डायव्हिंग स्पर्धेसाठी अर्णव, युवराज, तनवी, श्रेयाची निवड
बेळगाव : बेंगळूर येथील कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित सबज्युनिअर ज्युनिअर व सिनियर डायव्हिंग स्पर्धेत आबाहिंद क्लबच्या डायव्हिंगपटूंनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. केन्सिगटन हलसूर डॉल्फीन जलतरण तलावात अर्णव कुलकर्णीने ग्रुप-1 एक मी. प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये एक रौप्य पदक, युवराज मोहनगेकर ग्रुप 2, एक व तीन मी.मध्ये स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग एक सुवर्ण, एक रौप्यपदक, तन्वी कारेकर ग्रुप -3, तीन व एक मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये एक सुवर्ण एक रौप्य पदक व वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. श्रेया जोगमनावर ग्रुप-3 मध्ये एक व तीन मी. स्प्रिंगबोर्डमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य पदक संपादन केले. दरम्यान 4 ते 8 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी वरील चौघांची निवड झाली आहे. तसेच कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांची कर्नाटक राज्य संघात डायव्हिंग टीमचे मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली आहे.