महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूर्व लडाखमधून सैन्यमाघार सुरू

06:55 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत-चीनदरम्यान झालेल्या करारान्वये कार्यवाही : देपसांग-डेमचोकमधून तात्पुरते तंबू-शेड हटवले

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत आणि चीनच्या सैन्याने शुक्रवार, 25 ऑक्टोबरपासून पूर्व लडाख सीमेवरून माघार घ्यायला सुऊवात केली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देपसांग पॉइंटमधील त्यांचे तात्पुरते तंबू आणि शेड हटवले आहेत. वाहने आणि लष्करी उपकरणेही परत घेतली जात आहेत.

2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर सीमेवरील परिस्थिती बिघडली होती. मात्र, आता पूर्व लडाख सेक्टरमधील डेमचोक आणि देपसांग येथील दोन संघर्षाच्या ठिकाणी भारत आणि चिनी सैन्याने माघार घेतली आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देश देपसांग आणि डेमचोकमधून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतील. 31 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांचे लष्कर वेगवेगळ्या दिवशी या दोन पॉइंटवर गस्त घालत एकमेकांना माहिती देतील. गस्तीसाठी मर्यादित सैनिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. हा आकडा कोणता आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. याशिवाय कमांडर स्तरावरील बैठकाही सुरू राहणार आहेत.

देपसांग आणि डेमचोक येथून सैन्यमाघार होणार असल्याची माहिती 18 ऑक्टोबर रोजी समोर आली होती. पंतप्रधान मोदींच्या ब्रिक्स दौऱ्यापूर्वी कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. ब्रिक्समध्ये मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. सर्व परिस्थितीत शांतता राखणे आवश्यक आहे, असे मोदी येथे म्हणाले होते.

करारामध्ये लडाखमधील डेपसांग अंतर्गत 4 मुद्यांवर करार झाला आहे. परंतु गलवान व्हॅली आणि डेमचोकमधील गोगरा हॉट स्प्रिंग्समध्ये गस्त घालण्याबाबत काहीही सांगितले गेले नाही. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, सैनिक आता गस्त घालण्यासाठी देपसांगमधील गस्त बिंदू 10, 11, 11-ए, 12 आणि 13 वर जाऊ शकतील. तर, पेट्रोलिंग पॉईंट-14 म्हणजेच गलवान व्हॅली, गोगरा हॉट स्प्रिंग्स म्हणजेच पीपी-15 आणि पीपी-17 हे बफर झोन आहेत. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, येथे गस्त घालण्याबाबत नंतर विचार केला जाईल, असे म्हटले आहे. बफर झोन म्हणजे असे क्षेत्र जिथे दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येऊ शकत नाही.

भारत-चीन गस्त करार

करारानुसार, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) एप्रिल 2020 मध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास चीन आणि भारत सहमत झाले. याचा अर्थ आता चिनी सैन्याने ज्या भागात अतिक्रमण केले होते तेथून माघार घेणार आहे. भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागात गस्त घालून 2020 नंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दोन्ही देश यावर पावले उचलतील, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्री यांनी जाहीर केले होते.

चीनने 50 टक्के सैन्य हटवले

सुमारे 4 वर्षांनंतर भारत आणि चीनमध्ये परिस्थिती सामान्य होत असल्याचे दिसत आहे. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी मोठा करार केला आहे. या करारानुसार, दोन्ही देशांचे सैन्य 2020 च्या स्थितीत परत जातील आणि सीमेवर तोडगा काढला जाईल. आता भारत आणि चीनमधील या कराराचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देपसांगमध्ये आतापर्यंत 50 टक्के विघटन पूर्ण झाले आहे. दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात आले आहे.

पेट्रोलिंगची प्रक्रिया काय असेल?

दोन्ही देश एकमेकांच्या कमांडरना गस्तीदरम्यान सैनिकांची संख्या किती असेल याची माहिती हॉटलाईनवर देतील. लांब पल्ल्याची गस्त आणि कमी पल्ल्याच्या गस्तीची संपूर्ण माहिती आणि वेळ एकमेकांना सांगितली जाईल. या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होईल. ही प्रक्रिया एका महिन्यात दोनदा किंवा अधिक वेळा होऊ शकते. तसेच दोन्ही देश स्थानिक पातळीवरही एकमेकांशी चर्चा करत दोघांमधील परस्पर समंजसपणाचे पालन करतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article