For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमुचे सैन्य भीष्माने रक्षिले पांडवांचे ते भीमाने रक्षिले असे

06:53 AM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमुचे सैन्य भीष्माने रक्षिले  पांडवांचे ते भीमाने रक्षिले असे
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

संजय म्हणाला, दुर्योधनाने द्रोणाचार्यांना पांडवांच्या सैन्याचा परिचय करून देताना सेनेतील विराट, महारथी द्रुपद, सात्यकी, विराट, धृष्टकेतु, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतिभोज, नरवीर शैब्य, पराक्रमी युधामन्यू, वीर्यशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीच्या महारथी पुत्रांचा उल्लेख केला. त्यानंतर त्याच्या सैन्यातील प्रमुख महायोद्धे कोण आहेत हे सांगणारे आता जे अमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक । सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ।।7।। स्वत: आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो । अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ।। 8।। अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया । सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ।। 9 ।। हे श्लोक आपण पहात आहोत. कौरवांच्या सैन्यात प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्य असलेले गंगापुत्र भीष्म आहेत, वीर कर्ण आहे. ह्यांचे सामर्थ्य असे की, या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतो. दुर्योधन पुढे म्हणाला, फार कशाला? हा एकटा कृपाचार्य पांडवांना पुरेसा आहे. येथे विकर्ण आहे. तो पलीकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहेमी बाळगत असतो. समितिंजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. आणखी इतरही अनेक वीर माझ्याकरता जिवावर उदार झालेले आहेत. हे सर्व नाना प्रकारच्या शस्त्रांनी संग्राम करणारे आणि युद्धशास्त्रात प्रवीण असे आहेत. ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे? जेवढी म्हणून अस्त्रs आहेत, तेवढी सर्व ह्यांनीच प्रचारात आणली आहेत. हे या जगातील अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. हे सर्व वीर जिवावर उदार होऊन माझ्यासाठी लढणार आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेला पती हेच सर्वस्व असते त्याप्रमाणे ह्या चांगल्या योद्ध्यांसाठी मीच सर्वस्व आहे. माझ्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामिभक्त आहेत. हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्ती मिळवणारे आहेत. फार काय सांगावे? क्षात्रधर्म यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे असे म्हंटले तरी चालेल. याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची किती गणती करू? हे तर अपार आहेत.

पुढील श्लोकात दुर्योधन सांगतो की, सेनापती भीष्मांनी सर्व बाजूंनी रक्षण केलेले आमचे सैन्य अजिंक्य आहे, पण भीमाने सर्व बाजूंनी रक्षण केलेले त्यांचे सैन्य क्षुद्र असल्याने जिंकण्यास सोपे आहे.

Advertisement

अफाट अमुचे सैन्य भीष्माने रक्षिले असे । मोजके पांडवांचे ते भीमाने रक्षिले असे ।।10।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, दुर्योधन द्रोणाचार्यांना असे म्हणाला की, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नावाजलेले योद्धे असलेले भीष्माचार्य, हे आमचे सेनापती आहेत. आता यांनी आपल्या सामर्थ्याने या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जणू काही हे अभेद्य किल्लेच आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही क:पदार्थ आहे. आधीच समुद्र ओलांडायला कठीण त्यात पाण्यात प्रदीप्त होणारा वडवानल साह्यकारी व्हावा किंवा प्रलयकाळचा अग्नि व प्रचंड वारा या दोहोंचा मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड आपल्या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.