For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करणी सेनेच्या प्रमुखाला गोळ्या घालणारा लष्करी जवान

06:15 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
करणी सेनेच्या प्रमुखाला  गोळ्या घालणारा लष्करी जवान
Advertisement

तपासासाठी एसआयटी स्थापन; राजस्थानमध्ये घटनेचा निषेध

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. यापैकी एक शूटर रोहित हा मकरानाचा असून दुसरा नितीन हा हरियाणाच्या महेंद्रगडचा रहिवासी आहे. नितीन सध्या सैन्यात आहे. त्यानेच गोगामेडी यांच्या डोक्मयात गोळी झाडली होती. या हत्येच्या तपासासाठी राजस्थान पोलिसांनी एसआयटीचीही स्थापना केली आहे

Advertisement

गोगामेडी यांच्या भरदिवसा झालेल्या हत्याकांडानंतर संपूर्ण राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. गोगामेडी यांच्यावर गोळीबार करणारा नितीन नोव्हेंबर महिन्यात सुट्टीवर घरी आला होता. काही दिवसांनी तो निघून गेला. आता गोगामेडी हत्याकांडाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी नितीनला ओळखले. नेमबाज नितीन पंजाबच्या भटिंडा तुऊंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुंड संपत नेहराच्या संपर्कात होता. संपत नेहराने या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच राजस्थान पोलिसांनी हरियाणातील विविध भागात छापे टाकले. यासोबतच पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह राज्यात या घटनेशी संबंधित अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

या हत्याकांडानंतर आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. करणी सेनेने राजस्थान बंदची हाक दिल्यामुळे राज्यभरातील बाजारपेठा बंद आहेत. जयपूर शहरात धावणाऱ्या लो फ्लोअर बसेस बुधवारी रोखण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.