For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक महिन्याने वाढला सैन्यप्रमुख पांडे यांचा कार्यकाळ

06:42 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक महिन्याने वाढला सैन्यप्रमुख पांडे यांचा कार्यकाळ
Advertisement

30 जून रोजी होणार निवृत्त : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढविण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रविवारी जनरल पांडे यांच्या सेवाविस्ताराला मंजुरी दिली आहे. विस्तारानंतर जनरल पांडे आता 30 जूनपर्यंत सैन्याचे प्रमुख असतील. पांडे हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढविण्यात आला आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सैन्य नियम 1954 चा नियम 16 अ (4) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे डिसेंबर 1982 मध्ये सैन्याच्या इंजिनियर कोरमध्ये कमिशन्ड झाले होते.

मनोज पांडे यांनी 30 एप्रिल 2022 रोजी सैन्यप्रमुख पद सांभाळले होते. त्यांनी जनरल एम. एम. नरवणे यांची जागा घेतली होती. सैन्यप्रमुख होण्यापूर्वी पांडे हे सैन्याचे उपप्रमुख होते. सैन्यप्रमुख होणारे पांडे हे कोर ऑफ इंजिनियर्सचे पहिले अधिकारी ठरले आहेत. आतापर्यंत इन्फ्रंट्री, आर्म्ड आणि आर्टिलरी अधिकारीच प्रामुख्याने सैन्यप्रमुख झाले होते.

सैन्याच्या पूर्व कमांडचे पांडे हे कमांडर देखील राहिले आहेत. ही कमांड ईशान्येतील राज्ये सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबत लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या रक्षणासाठी तैनात आहे. याचे मुख्यालय कोलकात्यात आहे. तसेच पांडे यांच्याकडे अंदमान आणि निकोबार कमांडची धुरा होती.

Advertisement
Tags :

.