महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सैन्य, वायुदलाला मिळणार 156 प्रचंड हेलिकॉप्टर्स

06:48 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय : एचएएल करणार पुरवठा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संरक्षण मंत्रालयाने सैन्यासाठी 90 तर भारतीय वायुदलासाठी 66 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ची हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) मागणी केली आहे. यासंबंधी रिक्वेस्ट फॉर प्रपोजलही जारी करण्यात आले आहे. ही 156 प्रचंड हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर तैनात करण्यात येणार असल्याचे मानले जातेय.

सैन्याकडे सध्या 5 प्रचंड हेलिकॉप्टर्स आहेत. तर वायुदलाकडे 10 प्रचंड हेलिकॉप्टर्स आहेत. या हेलिकॉप्टर्सना चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांनजीक तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर नव्याने प्राप्त होणारी हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या सामरिक केंद्रांवर तैनात केली जातील.

पाकिस्तानच्या सीमेनजीक पहिली स्क्वॉड्रन तैनात असल्याने तेथे सीमेनजीक देखरेख करणे अधिक सोपे ठरले आहे. तसेच दहशतवादी आणि घुसखोरांना रोखण्यास मदत मिळत आहे. प्रचंड हेलिकॉप्टरद्वारे कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू (सीएसएआर), डिस्ट्रक्शन ऑफ एनेमी एअर डिफेन्स (डीईएडी), काउंटर इन्सर्जंसी (सीआय) ऑपरेशन, रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट पाडविणे शक्य होते. तसेच हाय अल्टीट्यूट बंकर बस्टिंग ऑपरेशन्स करणे शक्य झाले आहे. या हेलिकॉप्टर्सना 7 युनिट्समध्ये 7 वेगवेगळ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये तैनात केले जाईल. एलचीएचमध्ये दोन जण सामावू शकतात. हे 51.10 फूट लांब, 15.5 फूट उंच आहे. पूर्ण सामग्रीनिशी याचे वजन 5800 किलोग्रॅम इतके असते. यावर 700 किलोग्रॅम वजनापर्यंतची शस्त्रास्त्रs जोडली जाऊ शकतात. तर याचा कमाल वेग 268 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

सलग तीन तास उड्डाण क्षमता

या हेलिकॉप्टरची उड्डाणकक्षा 550 किलोमीटर असून सलग 3 तास 10 मिनिटांपर्यंत उड्डाण करण्याची यात क्षमता आहे. पुरेशा प्रमाणात शस्त्रास्त्रs तसेच आवश्यक सामग्रीसह हे हेलिकॉप्टर 16,400 फुटांच्या उंचीवरही टेकऑफ करू शकते. एलसीएचमध्ये 20 मिमीची एक तोफ आहे. तर यात रॉकेट्स, क्षेपणास्त्रs आणि बॉम्ब जोडले जाऊ शकतात. भविष्यात याच्या वर्जनला आणखी अत्याधुनिक रुप दिले जाणार आहे.

जुनी हेलिकॉप्टर्स हटविली जाणार

एलसीएच हेलिकॉप्टर्सची युनिट जोधपूरमध्ये तैनात केली जात आहे. जुनी एमआय-35 आणि एमआय-25 हेलिकॉप्टर्सना सेवेतून हटविण्यात येणार आहे. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स रशियाने निर्माण केली होती. त्यांची एक स्क्वॉड्रन संपुष्टात आणली गेली आहे. त्यांच्याजागी बोइंग कंपनीचे एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article