महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युएनजीएमध्ये शस्त्रसंधीचा प्रस्ताव संमत

06:49 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायल-हमास युद्ध : प्रस्तावाच्या बाजूने भारताचे मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत (युएनजी) मंगळवारी रात्री उशिरा गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव संमत झाला आहे. भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघात संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया समवेत 153 देशांनी शस्त्रसंधीच्या बाजूने मतदान केले. अमेरिका, इस्रायल समवेत 10 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आहे. तर 23 देशांनी या मतदानात भाग घेतला नाही.

तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना इशारा दिला आहे. गाझामध्ये सातत्याने हल्ले करण्यात येत असल्याने इस्रायल जागतिक समर्थन गमावत आहे. इस्रायलने आता युद्धातील भूमिका बदलावी, अन्यथा याचा प्रभाव आगामी काळात प्रतिकूल असेल असे बिडेन यांनी इस्रायलला उद्देशून म्हटले आहे. तर नेतान्याहू यांनी अमेरिकेसोबत काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे मान्य केले आहे. गाझामध्ये सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी इस्रायलने कठोर पावले उचलावीत असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर इस्रायल याच्या विरोधात आहे.

चुकीची पुनरावृत्ती टाळणार

नेतान्याहू यांनी एक व्हिडिओरुपी वक्तव्य जारी केले आहे. युद्ध आम्ही कसे संपवावे? आमचे नागरिक आणि सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. ज्यांनी क्रौर्य केले, त्या सर्वांचा विनाश घडवून आणला जाणार आहे. 1990 च्या दशकात आम्ही ओस्लो कराराच्या स्वरुपात एक चूक केली होती. आता आम्ही या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. अमेरिकेसोबत काही मुद्द्यांवर आम्ही सहमत नाही, तरीही आम्ही मदतीसाठी त्यांचे आभारी आहोत असे नेतान्याहू यांनी यात म्हटले आहे.

ग्राउंड ऑपरेशनचा निर्णय आम्ही अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. हमासचा खात्मा केल्यावरच ही मोहीम संपुष्टात आणली जाईल. ओलिसांच्या सुटकेकरता प्रयत्न सुरू असून योग्यवेळी त्याबद्दल माहिती दिली जाणार असल्याचे नेतान्याहू यांनी नमूद केले आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायल दौऱ्यावर

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन लवकरच इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्टिन हे ओलिसांची मुक्तता आणि शस्त्रसंधीसंबंधी बिडेन यांचा संदेश नेतान्याहू यांना देऊ शकतात असे मानले जात आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांच्या निमंत्रणावर ऑस्टिन हे तेल अवीव येथे असल्याचाही दावा करण्यात येत आहे. गाझामध्ये सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी कठोर पावले उचलावीत असा दबाव अमेरिका इस्रायलवर टाकत आहे. अशा स्थितीत त्यांचा हा दौरा होत असल्याने विशेष महत्त्व आहे. इस्रायल सरकार आणि सैन्याने गाझामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी मदतीचे मार्ग खुले करावेत याकरता ऑस्टिन आग्रही राहू शकतात.

जागतिक बँकेकडून गाझाला मदत

गाझाच्या मदतीसाठी त्वरित स्वरुपात 20 लाख डॉलर्सचा निधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा जागतिक बँकेने केली आहे. जागतिक बँकेकडून काही दिवसांपूर्वी 35 दशलक्ष डॉलर्सचा मदतनिधी जाहीर करण्यात आला होता.

तुर्कियेत खासदाराला हार्ट अटॅक

तुर्कियेच्या एका खासदाराला मंगळवारी संसदेत हार्ट अटॅक आला आहे. 53 वर्षीय हसन बिटमेज हे स्वत:च्या भाषणात इस्रायलला दुषणे देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका बसला असून या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. इस्रायल देवाच्या नजरेपासून, त्याच्या कोपापासून वाचू शकत नाही असे म्हणताच बिटमेज हे खाली कोसळले होते. त्यांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article