कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी

05:06 PM Jun 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

मसूर :

Advertisement

कराड तालुक्यातील हेळगाव येथे शुक्रवारी 20 रोजी पहाटेच्या सुमारास एका घरात घुसून चार अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत महिलांचे दागिने हिसकावून एकूण अडीच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारी असणाऱ्या बंद घरांमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

Advertisement

सदर घटना हेळगाव-कोरेगाव रस्त्यालगत असणाऱ्या विरळ वस्तीतील सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घरी घडली. पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी किचनचा दरवाजा जोरजोरात आपटून कडी उघडत घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सुनंदा सूर्यवंशी जाग्या झाल्या असता, दोघा चोरट्यांनी त्यांच्यावर कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली.

दोघींचे मिनीगंठण हिसकावले

सुनंदा यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्याचवेळी झोपलेल्या मुलीच्या गळ्यातील मिनी गंठणसुद्धा हिसकावण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून त्यामधून सोन्याचे डुल चोरले. एकूण अडीच तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

या घटनेत एकूण चार चोरटे सामील होते. यातील दोन जण घरात शिरले होते, तर इतर दोन जण बाहेर पहाऱ्यावर होते. चोरट्यांनी टी-शर्ट व बर्मुडा घातलेला होता. अंदाजे 30 ते 35 वयोगटातील होते. चोरी करून ते लगेचच उसाच्या शेतातून पळून गेले.

याच रात्री चोरट्यांनी शेजारील नंदा हणमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे, बाबासो जगन्नाथ पाटील व अर्जुन भीमराव सूर्यवंशी यांच्या बंद घरांमध्येही चोरीचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

घटना घडल्यानंतर त्वरित सुनंदा सूर्यवंशी यांच्या मुलीने 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. काही वेळातच एलसीबी सातारा, कराड शहर पोलीस, कराड तालुका डीबी पथक, उंब्रज, तळबीड व मसूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व एलसीबी सातारा विभागाचे अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले आहेत

या प्रकरणी सुनंदा संजय सूर्यवंशी यांनी मसूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि आदीनाथ खरात करत आहेत.

सदर घटनेनंतर मुलीने 112 वर कॉल केल्यानंतर पोलीस 15-20 मिनिटांत पोहोचले. एलसीबी, डीबी पथक, स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तारळवाडी खिंड, पाडळी, व अन्य मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली. मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते

हेळगाव ग्रामपंचायतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. ग्रामसभांमध्ये याबाबत आवाज उठवला असतानाही ग्रामपंचायतीकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे चोरट्यांचे कोणतेही दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेले नाही. ग्रामस्थांनी तातडीने हे कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

...

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article