महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुनला आर्मेनियातील बुद्धिबळ स्पर्धेचा किताब

06:26 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाईव्ह रेटिंग’मध्ये चौथ्या स्थानावर झेप घेण्यात यश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगायसीने आणखी एक जोरदार कामगिरी करून अर्मेनियाच्या जेर्मुक येथे स्टेपन अवग्यान स्मृती 2024 स्पर्धेचा किताब जिंकला आहे. या 20 वर्षीय भारताच्या सर्वोच्च मानांकित बुद्धिबळपटूने आठव्या आणि उपांत्य फेरीत रशियन ग्रँडमास्टर वोलोदार मुर्झिनचा 63 चालींमध्ये पराभव केला. चार विजय आणि तितक्याच बरोबरींसह तो सहा गुणांवर पोहोचला आहे. 10 खेळाडूंच्या या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे असलेल्या तीन खेळाडूंवर त्याने आता 1.5 गुणांची अभेद्य आघाडी मिळविलेली आहे. या विजयामुळे अर्जुनला लाइव्ह रेटिंग क्रमवारीतील कारकिर्दीतील सर्वोच्च चौथ्या स्थानावर पोहोचण्यास मदत झाली आहे. त्याने आतापर्यंत आठ फेऱ्यांमधून 9 गुण कमावताना एकूण 2779.9 ‘एलो’ गुण मिळवले आहेत. तो लाईव्ह रेटिंगमध्ये नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि अमेरिकेचा फॅबियानो काऊआना यांच्या मागे आहे.

‘माझ्यासाठी ही एक विलक्षण स्पर्धा राहिलेली आहे. कारण मी माझ्या संधींचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकलो आहे. या स्पर्धा कधीच सोप्या नसतात कारण स्पर्धेची पातळी खूप उंच असते. पण मी ज्या प्रकारे खेळून माझे दुसरे विजेतेपद पटकावले आहे त्यावर मी आनंदित आहे’, असे अर्जुनने म्हटले आहे. अर्जुन यंदा चांगलाच फॉर्मात आहे. त्याने एप्रिलमध्ये मेनोर्का ओपनचा किताब जिंकला होता, तर मेमध्ये टेपे सिगेमन बुद्धिबळ स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आणि शारजाह मास्टर्स ओपन स्पर्धेत संयुक्तरीत्या पाचवे स्थान मिळवले. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत अर्जुनचा सामना पेट्रोस्यानशी होईल आणि तो त्यात विजय मिळवून लाईव्ह रेटिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला काऊआना (2795.6 एलो गुण) आणि त्याच्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article