अर्जुन - वेई यी दुसरी लढतही बराबरीत, आता टायब्रेकरवर निकाल
वृत्तसंस्था/पणजी
येथे चालू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या क्वार्टरफायनलमध्ये ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने मंगळवारी चीनच्या वेई यीसोबत आणखी एक बरोबरी साधली आणि आता तो टायब्रेकरमध्ये सामना खेळेल. पहिला गेम फारशी झुंज न होता अनिर्णित राहिला होता आणि अर्जुनला त्यात सुऊवातीलाच वेई यीने आर्श्चचकीत केले होते. यावेळी चिनी खेळाडूने काळ्या सोंगाट्यांसह खेळताना लक्ष वेधून घेतले आणि हा सामना सहज बरोबरीत सुटला. एका टप्प्यावर दोन्ही खेळाडूंना लक्षात आले की, आणखी चाली खेळण्यात काही अर्थ नाही आणि 32 व्या चालीनंतर खेळ अनिर्णितावस्थेत संपला.
दरम्यान, उपांत्य फेरीतील चार स्थानांपैकी फक्त एकावर अद्याप दावा करण्यात आला आहे. इतर तीन स्थानांसाठी टायब्रेकरमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. कारण मंगळवारी बुद्धिबळ विश्वचषकाच्या क्वार्टरफायनलच्या दुसऱ्या दिवशी सर्व चारही सामने अनिर्णित राहिले. मात्र त्यातून उझबेकिस्तानचा नोदिरबेक याकुबोएव्ह हा अंतिम चारमध्ये पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या देशाच्या राष्ट्रीय ध्वज दिनी त्याने ही कामगिरी. पहिल्या सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर डोन्चेन्कोला हरवलेले असल्याने त्याला फक्त बरोबरीची आवश्यकता होती.