कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून लखनौकडे

06:44 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

मुंबई इंडियन्सकडून लखनौ सुपर जायंट्सकडे करारबद्ध झालेला अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये नवीन सुऊवात करण्यासाठी सज्ज झाला आहे, ‘फ्रँचायझी रिटेन्शन’च्या घोषणेनंतर झालेल्या उल्लेखनीय घडामोडींपैकी ही एक आहे. हा डावखुरा गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू मुंबईसोबतच्य दोन हंगामांनंतर आता संघ बदलणार आहे. त्याला आता नवीन प्रशिक्षण गट, ड्रेसिंग रूममधील वेगळे वातावरण लाभणार असून कारकिर्दीत नव्याने सुऊवात करण्याची संधीही मिळणार आहे.

Advertisement

अर्जुनने 2021 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश केला जेव्हा मुंबईने त्याला मिनी लिलावात 20 लाख ऊपयांना करारबद्ध केले. आयपीएल, 2020 दरम्यान तो संघासोबत नेट बॉलर म्हणून यूएईला गेला असला, तरी तो त्या वर्षी कोणत्याही सामन्यात दिसला नाही. ‘एमआय’ने त्याला 2022 च्या मेगा लिलावात पुन्हा 30 लाख ऊपयांना करारबद्ध केले. त्यावेळी गुजरात टायटन्सनेही त्याच्यासाठी बोली लावली होती. तरीही 2022 मध्ये पदार्पणाची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्याचे बहुप्रतिक्षित पदार्पण अखेर 2023 मध्ये झाले. चार सामन्यांमध्ये त्याने 59 चेंडूंत 92 धावा देत 3 बळी घेतले आणि फलंदाजीत 13 धावा जोडल्या. त्याने आशादायक झलक दाखवली असली, तरी एमआयच्या वेगवान गोलंदाजीचा विभाग समृद्ध असल्याने त्याला सातत्याने सामन्यात खेळायला मिळणे कठीण झाले.

लखनौला गेल्याने त्याच्या कराराच्या रकमेत बदल झालेला नाही. एलएसजीने आयपीएल, 2026 साठी त्याचा 30 लाख ऊपयांचा विद्यमान करार कायम ठेवला आहे. 2022 च्या मेगा लिलावापासून तो इतकीच रक्कम कमावत आला आहे. यामुळे आणि विशेषत: पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची आणि खालच्या फळीत योगदान देण्याची त्याची क्षमता पाहता लीगमधील अधिक किफायतशीर अष्टपैलू पर्यायांमध्ये त्याला स्थान मिळाले आहे.

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article