महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुनचे पदक थोडक्यात हुकले

06:59 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 मी एअर रायफलमध्ये चौथे स्थान :

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी पुरुषांच्या 10 मी एअर रायफल फायनलमध्ये भारताचा अर्जुन बबुता चौथ्या स्थानी राहिला अन् पदकाला मुकला. रविवारी मनू भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताच्या नजरा आणखी एका पदकाकडे लागल्या होत्या. पण, अर्जुन चौथ्या स्थानी राहिल्याने कांस्यपदकाने त्याला हुलकावणी दिली. याशिवाय, महिलांच्या 10 मी एअर रायफल प्रकारात रमिता जिंदाल सातव्या स्थानी राहिली. या दोन्ही प्रकारात भारताने अंतिम फेरी गाठली होती पण पदक जिंकण्यात मात्र अपयश आले.

अंतिम फेरीत अर्जुनने दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काही स्टेजमध्ये तो टॉप-3 मध्ये होता, मात्र त्यानंतर त्याचे काही नेम दूरवर लागले. याचा त्याला फटका बसला व टॉप-3 मधून तो चौथ्या स्थानी घसरला. अर्जुन जेव्हा या फेरीतून बाहेर पडला तेव्हा त्याचे 208.4 गुण होते. अर्जुन बाहेर पडल्यानंतर चीनच्या लिहाओ शेंगने ऑलिम्पिक विक्रमासह 252.2 गुण मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्वीडनच्या व्हिक्टरने 251.4 गुणासह रौप्य तर क्रोएशियाच्या मिरानने 230 गुणासह कांस्यपदक पटकावले. 25 वर्षीय अर्जुनने रविवारी पुरुषांच्या 10 मी एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावात अंतिम फेरी गाठली होती. आज त्याला पदक जिंकण्याची नामी संधी होती पण मोक्याच्या क्षणी नेम चुकल्याने त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. अर्जुन हा मूळचा चंदीगडचा आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर अर्जुनने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता.

रमिता जिंदालही अंतिम फेरीत पराभूत

भारताच्या रमिता जिंदालने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या मेडलच्या लढतीत तिच्या पदरी निराशा आली. रमिता 8 जणांच्या इव्हेंटमध्ये 7व्या स्थानी राहिली. तिने एकूण 145.3 गुण मिळवले. या प्रकारात सुवर्णपदक दक्षिण कोरियाच्या बान योजिनने, चीनच्या हुआंग युएटिंगने रौप्यपदक तर स्वित्झर्लंडच्या आंद्रे गोग्नियातने कांस्यपदक पटकावले. ह्योजिनने 251.8, हुआंग युटिंगने 251.8 आणि गोग्निएटने 230.3 गुण मिळवले. रमिताने पहिल्या श्टॉसमध्ये आश्वासक सुरुवात केली होती पण दुसऱ्या शॉट्समध्ये तिची कामगिरी खालावली, याचा तिला फटका बसला. यानंतर तिला सातत्य न राखता आल्याने सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या रमिताने अंतिम फेरीत चांगलाच संघर्ष केला. रमिता ही हरियाणातील कुरुक्षेत्रची रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ऑलिम्पिक फायनलमध्ये खेळणे ही रमिता जिंदलसाठी मोठी उपलब्धी असल्याचे मानले जाते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला पराभव पत्करावा लागला असला तरी आगामी काळात ती भारतासाठी सुपरस्टार ठरू शकते.

मनू भाकरची नजर पुन्हा कांस्य पदकावर

रविवारी भारताच्या मनू भाकरने कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर ती 10 मी एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबजोत सिंगसह सहभागी झाली आहे. या प्रकारात मनू भाकर-सरबजोत सिंग व अर्जुन सिंग-रिदम सांगवान या दोन जोड्यांनी सहभाग नोंदवला होता. पात्रता फेरीत मनू व सरबजोतने तिसरे स्थान पटकावले व कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले. या भारतीय जोडीने 580 गुणाची कमाई केली. विशेष म्हणजे, मनू व सरबजोत यांनी कांस्य जिंकले तर मनूच्या नावे विक्रम नोंदवला जाईल. जर तिने आज पदकाची कमाई केली तर ऑलिम्पिक इतिहासात भारतासाठी दोन पदके जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरणार आहे. या प्रकारात तुर्कस्थानच्या जोडीने 582 गुणासह पहिले तर सर्बियाच्या जोडीने 581 गुणासह दुसरे स्थान पटकावले. भारतीय जोडीने 580 गुणासह तिसऱ्या तर कोरियन जोडी 579 गुणासह चौथ्या स्थानी राहिली. दुसरीकडे भारताच्या रिदम व अर्जुन जोडीला पात्रता फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही, त्यांना दहावे स्थान मिळाले. दरम्यान, मिश्र सांघिकचा हा पदकासाठीचा सामना मंगळवारी दुपारी होईल. सुवर्णपदकासाठी तुर्कस्थान व सर्बिया यांच्यात लढत होईल. भारताचे नेमबाज कांस्यपदकासाठी कोरियाच्या नेमबाजांशी भिडतील.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#sports
Next Article