For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईसाठी कर्ण ठरला अर्जुन

06:55 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबईसाठी कर्ण ठरला अर्जुन
Advertisement

हरणारा सामना मुंबईने जिंकला : नाट्यामय सामन्यात मुंबईचा दिल्लीवर 12 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबई इंडियन्ससाठी फिरकीपटू कर्ण शर्मा (3 बळी) अर्जुन ठरल्याचे पाहायला मिळाले. कर्ण शर्माने महत्वाचे तीन विकेट्स काढले आणि त्यामुळे मुंबईला दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी विजय मिळवता आला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभारला. पण करुण नायरपुढे मुंबईच्या गोलंदाजांना काहीच करता आले नाही. करुण नायरने या सामन्यात 40 चेंडूंत 12 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 89 धावांची खेळी साकारली. पण तो बाद झाला आणि सामना मुंबईच्या बाजूने सामना फिरला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संपूर्ण संघ 193 धावांत ऑलआऊट झाला. क्मुंबईचा हा सहा सामन्यातील दुसरा विजय ठरला.

Advertisement

रोहित शर्माने मुंबईला जोरदार सुरुवात करून दिली. पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी साकरण्यात अपयशी ठरला. कारण रोहितला 18 धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यावर सलामीवीर रायन रिकेल्टन आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. पण यावेळी रायन मोठा फटका मारायला गेला आणि तो बाद झाला. रायनने या सामन्यात 25 चेंडूंत 41 धावांची दमदार खेळी साकारली. यानंतर सूर्या आणि तिलक यांनी धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. ही जोडी आता मुंबई इंडियन्सला मोठी भागीदारी रचून देईल, असे वाटत होते. पण या मोक्याच्या क्षणी सूर्या बाद झाला. कुलदीप यादवने सूर्याला बाद केले. सूर्याने या सामन्यात 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 40 धावांची खेळी साकारली. तिलकने यावेळी सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर तिलकला जास्त काळी फलंदाजी करता आली नाही. तिलकने यावेळी 33 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या. तिलक बाद झाल्यानंतर नमन धीरने यावेळी 17 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 38 धावा करत संघाची धावगती वाढवली, त्यामुळे मुंबईला 205 धावा करता आल्या.

दिल्लीला पराभवाचा धक्का

दिल्लीचा संघ 205 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उचलला आणि पहिल्याच चेंडूवर मुंबईने दिल्लीला धक्का दिला. दीपक चहरने जॅक फ्रेझरला बाद केले. पण मुंबईचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण त्यानंतर करुण नायरने धमाकेदार फटकेबाजी केली आणि दिल्लीचा विजय दृष्टीपथात आणला. करुण व अभिषेक पोरेल यांना शतकी भागीदारी रचताना मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. करुणने अवघ्या 40 चेंडूच 89 धावांची विस्फोटक खेळी केली. पण तो फटकेबाजीच्या प्रयत्नात सँटेनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे दिल्लीचा डाव 193 धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 205 (रोहित शर्मा 18, रिकेल्टन 41, सुर्यकुमार यादव 40, तिलक वर्मा 33 चेंडूत 59, हार्दिक पंड्या 2, नमन धीर 17 चेंडूत नाबाद 38, विल जॅक्स नाबाद 1, कुलदीप यादव व विपराज निगम प्रत्येकी दोन बळी)

दिल्ली कॅपिटल्स 19 षटकांत सर्वबाद 193 (अभिषेक पोरेल 33, करुण नायर 89, आशुतोष शर्मा 17, निगम 14, कर्ण शर्मा 3 बळी, सँटेनर 2 बळी, बुमराह व चहर प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.