For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यावर तरंगणारे अर्जेंटीनाचे बेट

06:42 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाण्यावर तरंगणारे अर्जेंटीनाचे बेट
Advertisement

अंतराळातून पाहिल्यास दिसते नेत्रासमान

Advertisement

अर्जेंटीनामध्ये एक रहस्यमय बेट असून त्याचे नाव एल ओजो आहे. हे बेट अर्जेंटीनाच्या दलदलयुक्त पराना डेल्टामध्ये आहे. हे बेट तरंगणारे आहे. हे अत्यंत गोल आकाराचे असून ते आकाशातून एखाद्या नेत्राप्रमाणे भासते.  याच्या नावाचा अर्थ देखील नेत्र असाच होतो.

एका माहितीपटाच्या चित्रिकरणादरम्यान 2016 मध्ये निर्मात्यांचे लक्ष एल ओजोकडे गेले. दिग्दर्शक सर्गियो न्यूस्पिलर यांच्या नेतृत्वात पथकाने बेटावरून उ•ाण केले होते. यादरम्यान त्यांना डेल्टाच्या कापलेल्या वनस्पतींदरम्यान बेटाचे अस्तित्व दिसून आले. पाण्यात पाहताना हे बेट अत्यंत काळे भासत होते, परंतु प्रत्यक्षात हे पारदर्शक होते. डेल्टामध्ये पाणी अस्वच्छ असते, अशा स्थितीत साफ पाणी शोधणे देखील दुर्लभ आहे, एल ओजो एक क्रिस्टल स्पस्ट सरोवरात तरंगणारे बेट आहे.

Advertisement

सरोवराच्या पाण्यामुळे या बेटाच्या काठांची झीज होत आहे. या अत्यंत गोल आकाराच्या बेटाचा व्यास 118 मीटर इतका आहे. हे बेट रोपांद्वारे निर्मित आहे. सरोवराच्या प्रवाहाद्वरो हे स्वत:च्या बाजूने फिरत असते आणि काठाला जाऊन चिकटते. या निरंतर गतिचा अर्थ एल ओजोने सरोवराला रुंद केले असा होतो.

बेटाबद्दल लोकांमध्ये भीती

अर्जेंटीनातील स्थानिक लोकांनुसार हे बेट दक्षिणावर्ती दिशेने फिरत असते. परंतु हे बेट कधी आणि कसे जमिनीपासून वेगळे झाले हे स्पष्ट नाही. परंतु सुमारे 20 वर्षांपूर्वी उपग्रहीय छायाचित्रांमध्ये हे दिसून आले होते. न्यूस्पिलर आणि त्यांच्या पथकाला शोधादरम्यान स्थानिक रहिवासी एल ओजोविषयी जाणत असल्याचे आढळून आले. स्थानिक लोक या बेटाला घाबरतात, कारण तेथे एक प्राचीन देवता राहत असल्याचे त्यांचे मानणे आहे. तर हे बेट परग्रहवासीयांना आकर्षित करणारे असल्याचे अनेक जणांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.