डायटवर आहात पण चटपटीत आणि कुरकुरीत खायचयं ? मग ट्राय करा ही रेसिपी
नुकत्याच झालेल्या दिवाळीत तुम्ही अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला असेल. पण जे लोक डायट करत आहेत त्यांनी मात्र तेलकट आणि तळलेले पदार्थ खाण्यापासून तोंडाला आवर घातला असेल. पण अशाच डायटप्रेमींसाठी आज आम्ही एक हेल्दी आणि चटपटीत रेसिपी पाहणार आहोत. ओट्स चिवडा हा चवीला देखील स्वादिष्ट आहे. चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी
साहित्य
१ कप ओट्स
१ चमचा तेल
कढीपत्ता
६-७ बदाम
६-७ काजू
शेंगदाणे
अर्धा चमचा साखर
हिंग
२ हिरव्या मिरच्या
कृती
ओट्स चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्या आणि मंद आचेवर ओट्स नीट भाजून घ्या. भाजताना ते सतत ढवळत राहा आणि सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढा. आता कढईत तूप किंवा तेल घालून गरम करा. त्यात बदाम शेंगदाणे आणि काजू घालून भाजून घ्या. नंतर ते टिश्यू पेपरवर काढा. आता गॅसची फ्लेम मंद करून तेलात कढीपत्ता घाला. तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंग घाला. अर्धा चमचा साखर घालून सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र करा. गॅस बंद करा आणि भाजलेले ओट्स मिक्स करा. चांगले मिसळा आणि थंड होऊ द्या. आता हे हवाबंद डब्यात भरून ठेवा. तुमचा हेल्दी ओट्स चिवडा तयार आहे.