For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2030 पर्यंत संपुष्टात येणार आर्क्टिकचे हिमखंड

06:09 AM Jun 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
2030 पर्यंत संपुष्टात येणार आर्क्टिकचे हिमखंड
Advertisement

जगातून 2.72 लाख टन बर्फ होणार गायब

Advertisement

2030 पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमखंड पूर्णपणे गायब होऊ शकतात, म्हणजेच 7 वर्षांनी उन्हाळ्यात येथे बर्फ दिसून येणार नसल्याचे एका संशोधन अहवालात म्हटले गेले आहे. आर्क्टिक हे जगातील उर्वरित हिस्स्यांच्या तुलनेत चार पट वेगाने उष्ण होत आहे. मागील 40 वर्षांमध्ये येथील बहुस्तरीय बर्फ 70 लाख चौरस किलोमीटरवरून कमी होत 40 लाख चौरस किलोमीटरवर आला आहे.

यामागील कारण हवामान बदल असल्याचे संशोधकांचे सांगणे आहे. हवामान बदलामुळे मागील 10 वर्षांमध्ये जगातील एकूण हिमखंडाचा 2 टक्के हिस्सा वितळला आहे. युरोपच्या क्रायोसॅट उपग्रहाने पृथ्वीवर सुमारे 2 लाख हिमखंडांचा शोध लावला आहे. यातून मिळालेल्या डाटानुसार हवामान बदलामुळे 10 वर्षांमध्ये या हिमखंडांमधील 2.72 लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. जगातील 20 टक्के लोकसंख्या पाण्यासाठी याच हिमखंडांवर अवलंबून आहे.

Advertisement

हवामान बदलामुळे ग्लेशियर किती बदलत आहेत हे जाणून घेण्यासाठी आता स्पेस ऑब्झर्व्हेशनची (उपग्रहीय छायाचित्रे, डाटा) मदत घेतली जात आहे. परंतु ग्लेशियरमध्ये काळासाब्sात मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान मोजणे कुठल्याही उपग्रहासाठी अवघड आहे. क्रायोसॅट युरोपीय अंतराळ संस्थेचा उपग्रह आहे. यात रडार ऑल्टीमीटर नावाचे उपकरण असून ते ग्लेशियरच्या उंचीचा शोध घेण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावर मायक्रोवेव्ह पल्स पाठविते. हे उपकरण अंटार्क्टिटक आणि ग्रीनलँड यासारख्या भागांमध्ये सहजपणे काम करते, परंतु ओबडधोबड किंवा दऱ्याखोऱ्यांच्या भागांमध्ये हिमाच्छादित पर्वतांच्या उंचीचे योग्यप्रकारे मोजमाप करू शकत नाही. परंतु डाटा प्रोसेसिंगमध्ये झालेल्या प्रगतीमुळे क्रायोसॅटच्या व्हिजनमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.

उपग्रहीय डाटानुसार 2010-20 दरम्यान 89 टक्के बर्फ उष्ण हवामानामुळे वितळला. तर केवळ 11 टक्के टक्के बर्फ नैसर्गिक प्रक्रियेमुळे म्हणजेच समुद्र किंवा सरोवरांचे उष्ण पाणी मिसळल्याने वितळला आहे.  2010-20 पर्यंत हवामान बदलाचा सर्वाधिक प्रभाव अलास्काच्या ग्लेशियर्सवर झाला आहे. येथे दरवर्षी 80 अब्ज टन बर्फ वितळला आहे. हे प्रमाण अलास्का येथील एकूण बर्फाच्या 5 टक्के इतके होते. तर आर्क्टिकच्या स्वालबार्ड आणि रशियाच्या बॅरेंट्स अँड कारा सीनजीक असलेले ग्लेशियर नैसर्गिक प्रक्रियेमुळे वितळले आहे.

Advertisement
Tags :

.