कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीमगड अभयारण्यातील कमानीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

11:32 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : भीमगड अभयारण निर्मिती झाल्यानंतर अभयारण्याच्या आरंभाच्या ठिकाणी खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर शिरोलीनजीक वनखात्याकडून विभागीय वनाधिकारी सुनीता निंबरगी यांच्या प्रयत्नातून भीमगड अभयारण्याच्या सुरुवातीला भव्य अशी कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन नुकतेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कमानीवर भीमगड अभयारण्यातील वावरत असलेल्या प्राण्यांची प्रतिकृती चित्रीत करण्यात आल्या आहेत. यात वाघ, अस्वल, हत्ती, किंग कोब्रा आणि दुर्मीळ अशी वटवाघळे यासह इतर प्राण्यांची प्रतिकृती या कमानीवर उभारण्यात आली आहेत.त्यामुळे ही कमान एकदम आकर्षक आणि निसर्गाची ओळख करून देणारी झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article