अर्चना घारे परब यांनी केली माडखोल येथील खचलेल्या पुलाची पाहणी
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब यांनी आज केली. यावेळी युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार राऊळ, संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, दिगंबर मालटकर आदी. उपस्थित होते.यावेळी सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भात ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारत लवकरात लवकर या कामाची चौकशी होण्याबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात अर्चना घारे परब यांनी ग्रामस्थांना सकारात्मक आश्वासन दिले. तसेच ग्रामस्थांशी याबाबत चर्चा करून तेथील हॉटेल व्यवसायिक यांच्याशी सुद्धा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आपल्या निवेदनात ग्रामस्थांनी सदर पूल तात्काळ दुरुस्त करणे संदर्भात तसेच पुलाच्या बोगस कामाबाबत योग्य ती चौकशी होणेसंदर्भात विनंती केली आहे.