महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंडखोर उमेदवार अर्चना घारेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

05:58 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

महाविकास आघाडीतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय समन्वयक अर्चना घारे - परब यांना पक्षाने निलंबित केले आहे. तसे पत्र पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांना दिले आहे. राज्यात काँग्रेस., राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटला आहे. त्या पक्षाचे उमेदवार येथे निवडणूक लढवत आहेत असे असताना अर्चना घारे परब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत हे पक्ष शिस्तीस धरुन नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. अर्चना घारे परब यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता बुधवारच्या सभेत टीका केली होती. महायुतीला मदत म्हणजे महाराष्ट्र द्रोहीना मदत करण्यासारखे आहे . महाविकास आघाडी महाराष्ट्र प्रेमी आहे . त्यामुळे आघाडीत बंडखोरी केलेले महाराष्ट्र द्रोही आहेत. असे ठाकरे म्हणाले होते .तर घारे परब यांना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रवीण भोसले यांनी म्हटले होते . या पार्श्वभूमीवर घारे परब यांचे झालेले निलंबन आघाडीला दिलासा देणारे आहे. जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भास्कर परब यांना हे पत्र आले आहे. त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात घारे- परब यांच्याबरोबर काम करणाऱ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचे काम करावे अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article