For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ॲपटेक एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांची हैदराबाद विमानतळासाठी निवड

11:40 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ॲपटेक एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांची हैदराबाद विमानतळासाठी निवड
Advertisement

बेळगाव : ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेळगावच्या विद्यार्थ्यांनी एव्हिएशन क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. या अकॅडमीच्या वैभव भोसले व सुहाना प्रजापती यांची हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार  करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांबरा-बेळगाव विमानतळाचे उपसरव्यवस्थापक प्रतापराव देसाई उपस्थित होते. उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतापराव देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. ॲपटेक एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे व सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती बामणे यांनीही विद्यर्थ्यांचे मनोधैर्य वाढविणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.