For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंजिनियर राशिदला शपथग्रहण करण्याची मंजुरी

06:22 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंजिनियर राशिदला शपथग्रहण करण्याची मंजुरी
Advertisement

न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दहशतवादविरोधी यंत्रणा एनआयएने तुरुंगात कैद काश्मिरी नेता इंजिनियर राशिद शेखला खासदार म्हणून शपथ घेण्याची अनुमती दिली आहे. आता याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. न्यायालय यासंबंधी मंगळवारी शपथग्रहणाच्या अटींवर निर्णय देणार आहे. राशिदला इंजिनियर राशिद  या नावाने ओळखले जाते. त्याने अलिकडेच बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता.

Advertisement

राशिद हा 2019 पासून तिहार तुरुंगात कैद आहे. एनआयएने त्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला आहे. 18 व्या लोकसभेत उर्वरित सदस्यांसोबत शपथ घेण्याची संधी त्याला मिळालेली नाही. तुरुंगात असूनही राशिदने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. राशिदच्या वतीने त्याच्या पुत्राने प्रचारमोहीम राबविली होती.

राशिदच्या अंतरिम जामीन अर्जावर स्पष्टीकरण देण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश किरण गुप्ता यांनी एनआयएला दिला होता. राशिदसोबत पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघातून विजयी झालेला खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंह देखील तुरुंगात कैद आहे. आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात तो 2023 पासून कैद आहे. अमृतपालचा जामीन अर्ज पंजाब सरकारचा गृह विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे, ज्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही असे त्याच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Advertisement
Tags :

.