For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणे पिता- पुत्रांच्या शिफारशीने कोट्यवधींच्या कामांना मंजुरी

09:22 PM Dec 14, 2023 IST | अनुजा कुडतरकर
राणे पिता  पुत्रांच्या शिफारशीने कोट्यवधींच्या कामांना मंजुरी
Advertisement

कणकवली /प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने पुरवणी अर्थसंकल्पीय अनुदान डिसेंबर २०२३ अंतर्गत रस्ते व पूल या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून देण्यात आला आहे. एकूण ५८ कामांसाठी ९१ कोटी ९७ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

Advertisement

आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी प्राप्त करून दिला असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये श्री. राणे यांनी शिफारस केलेल्या ५३ कोटी ६२ लाख रूपयांच्या ५२ कामांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या ३८ कोटी ३५ लाख रूपयांच्या ६ कामांनाही मंजूरी देण्यात आली आहे.

यामुळे कणकवली, देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील दळणवळणाची अत्यंत महत्वाची व प्रलंबित रस्ते व पूलांची कामे मार्गी लागणार आहेत. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे भाजपाकडून आभार मानण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.