वेदांताच्या विलगीकरणाला मान्यता
नवी दिल्ली :
’वेदांता या कंपनीच्या स्वतंत्र विलगीकरणाला समभागधारकांनी मंजुरी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. धातूपासून ते तेल अशा विविध क्षेत्रामध्ये कंपनी कार्यरत आहे. या अंतर्गत विलगीकरणामुळे 5 कंपन्या स्वतंत्रपणे कार्य करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. वेदांताच्या 99 टक्के समभागधारकांनी कंपनीच्या विलगीकरणाला सर्वानुमते मंजुरी दिली आहे. लवकरच 5 वेगळ्या कंपन्या स्वतंत्रपणे कार्य करु शकणार आहेत. या विलगीकरणानंतर वेदांताच्या समभाग धारकाला प्रत्येकी एक समभाग दिला जाणार आहे. कंपनीच्या वेदांता मेटल्स, वेदांता अॅल्युमिनीयम, वेदांता ऑईल अॅण्ड गॅस, वेदांता पॉवर, वेदांता आर्यन अॅण्ड स्टील अशा कंपन्या लवकरच स्वतंत्रपणे व्यवसाय करु शकणार आहे. वेदांता लि. ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी झिंक उत्पादक आणि तिसऱ्या क्रमांकाची चांदी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते.